Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

“झरा प्रेरणेचा” 8 th day (18 April 2020) by Dr. Avinash Saoji

Categories
Uncategorized

“झरा प्रेरणेचा” भाग ३ by Dr Avinash Saoji (13 April 2020)

Categories
Uncategorized

झरा प्रेरणेचा भाग ६ (Dr Avinash Saoji)

Categories
Uncategorized

भावेश भाटिया, महाबळेश्वर : डोळस अंधत्व

भावेश भाटिया, महाबळेश्वर 
२०१० मध्ये मी, माझीपत्नी सोहिनी मुलगा अपार सातारायेथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. एक दिवसथोडा मोकळा होता अपारची महाबळेश्वरबघण्याची फार तीव्र इच्छा होती, म्हणूनआम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्येप्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेशभाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचेवर्कशॉप आहे, तिथे१०१५ मिनिटांसाठीजावू नंतरपॉईंट्स बघू या म्हणून आधी भावेशकडेगेलो. भावेश भाटियानावाच्या अतिशय गोड व्यक्तिमत्वाच्याअंध व्यक्तीची झालेली तीपहिली भेट. तेथे त्यावेळी २५० प्रकारच्या सुगंधी डेकोरेटिव्ह मेणबत्त्यातयार केल्या जायच्यात. ते सर्व भावेशनेआम्हाला अतिशय जिव्हाळ्याने दाखविले. तो व त्याची पत्नी नीतासोबत बराच वेळ बोलत बसलो. दोन तास कसेगेलेत ते कळलेचनाही. तेथून निघतानामाझा २० वर्षांचामुलगा अपार म्हणालाकि, बाबा आतामहाबळेश्वरचे इतर पॉईंट्सनाही बघितले तरीचालेल. भावेशकडे आलो यातचसगळे महाबळेश्वर पाहण्याचाआनंद समाधानमळाले. जो अपारअतिशय आतुरतेने महाबळेश्वरपाहण्यासाठी म्हणून उत्सुक होतात्याचे हे उद्गारहोते; आणि खरोखरचआता महाबळेश्वराच्या पॉइंट्समध्येभावेश भाटिया यांच्यासनराईज कॅण्डल वॅक्ससंग्रहालय हा नवीनपॉईंट जोडल्या गेलेआहेत. 

भावेश मुळचा कच्छमधील. वडील उपजिवीकेसाठी महाराष्ट्रातगोंदियाला आलेले. भावेशची दृष्टीशाळेत असतानापासूनच त्यालाअसलेल्या रेटिनाच्या आजारामुळे कमीकमीहोत चाललेली. शाळेतीलइतर मुले त्यालाआंधळा म्हणून चिडवायची. १५१६ व्यावर्षी तर पूर्णतःअंधत्व आलेले. मात्र त्याची आई त्यालाम्हणायची तुला जगपहाता येत नसलेम्हणून काय झाले, असे काहीतरी करकि संपूर्ण जगतुझ्याकडे पाहायला लागेल. आईचेहे उद्गार त्याच्यासाठीकायम प्रेरणा देतराहिले. त्यामुळेच कदाचित भावेशपुढील आयुष्यात जगासाठीएक रोल मॉडेलबनला. दुर्दैवाने त्याचीआई पण याचदरम्यान कॅन्सरने गेली. तिच्याउपचारात बराच खर्चझाल्याने त्यांची आर्थिक परिस्थितीपण ढासळली होती. ते गोंदिया सोडूनमहाबळेश्वरला आलेत. तेथे उपजीविकेसाठी मिळेल ते कामकेले. भावेश लहानपणापासूनकल्पक सृजनशीलहोता. तो खेळणी, पतंग . अनेक कलात्मक वस्तू बनवायचा. तो १९९९ मध्येमुंबईच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमध्येमेणबत्त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणूनगेला. पण अंधांनाहे काम जमतनाही म्हणून मेणबत्तीऐवजी त्याला मसाजिंग प्रशिक्षणालाप्रवेश देण्यात आला. मसाजचेप्रशिक्षण घेत असतानामेणबत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांनामोफत  मसाजकरुन त्यांच्याकडून त्यानेमेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसातकेले. प्रशिक्षण पूर्णकरून महाबळेश्वरला परतआल्यावर तो मसाजिंगचेकाम करू लागला. पण मेणबत्ती बनविण्याचेत्याचे स्वप्न त्याला स्वस्थबसू देत नव्हते. त्याने घरच्या घरी मेणबत्त्याबनवून पाहणे सुरुकेले बाजारात५० रु. रोजाप्रमाणेभाड्याने घेतलेल्या ठेल्यावर त्यातो विकू लागला.

एक दिवस असाच भावेशबाजारात आपल्या ठेल्यावर मेणबत्या विकत होता. त्यादिवशी महाबळेश्वरलाहवापालट करण्यासाठी म्हणून काहीदिवस रहायला आलेलीनीता नामक युवती फिरत फिरत त्याच्या ठेल्याजवळ आली. एक अंध व्यक्ती मेणबत्त्या विकतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने भावेशबद्दल सविस्तर चौकशी केली. भावेशचाप्रामाणिकपणा, जिद्द पाहून तीप्रभावित झाली  दररोज त्याच्या कामात त्याला मदतकरायला म्हणून येऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री झाली ते प्रेमातकधी पडले हे त्यांना कळलेच नाही. दोघांनी लग्न करण्याचानिर्णय घेतला. एका अंधमेणबत्ती बनवून विकणाऱ्या गृहस्थाबरोबर, सर्व काहीव्यवस्थित असलेली नीता लग्नकरते म्हटल्यावर तिलाकुटुंबियांच्या विरोध होणे स्वाभाविकचहोते; पण नीताआपल्या निर्णयावर ठाम होती. तिने आपल्या आईवडिलांना राजी केले. वर्षभरानंतर त्यांचे लग्न झाले. लग्न करून त्यांनीमहाबळेश्वरलाच एका छोट्याशाघरात संसार थाटला. अन्न ज्या भांड्यांमध्ये शिजवायचे त्याचभांड्यात मेणबत्त्या बनविण्यासाठी मेणवितळविले जायचे. कारण त्यासाठीवेगळी नवीन भांडीखरेदी करण्याची पणत्यांची परिस्थिती नव्हती. मात्र आता नीता सोबत आल्याने भावेशच्या कामाला चांगलीच गती आली व त्यांचा व्यवसाय वाढू लागला. हळूहळूदोघांनी कष्टातून एक दुचाकीवाहन खरेदी केले. लग्नापूर्वी सायकलसुद्धा चालविता येणारी नीता आतादुचाकी पुढेचारचाकी वाहन पण चालवायलाशिकली.

भावेशने सुरुवातीला अनेक मेणबत्तीनिर्माते आणि संस्थांकडूनमार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणावा तास प्रतिसाद मिळालानाही. बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांनीही नकारदिला. भावेश नीतासोबतमॉलमध्ये जाऊन तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्यांना स्पर्शकरून, त्यांचा आकारआणि बनावट समजूनघ्यायला लागला. अशाप्रकारे मेणबत्तीबनविण्याचे कौशल्य त्याने हळूहळू आपल्या कल्पकतेने विकसितकरीत नेले. पुढेएका बँकेने त्याला१५ हजार रुपयेकर्ज दिले. त्यातूनत्यांनी कच्चा माल साचे खरेदी केले सनराइज कँडल हि कंपनी सुरुकेली. आज याकंपनीचा वार्षिक टर्नओव्हर २५कोटी रुपयांपेक्षा जास्तझाला आहे. किलो मेणापासून सुरुवातकेलेल्या भावेशला आता दररोज १२५ क्विंटल मेणमेणबत्त्या बनविण्यासाठी लागते. मेणबत्ती बनविण्यामध्येस्वतःची कल्पकता सृजनशीलतावापरून विविध प्रकारच आकर्षकसुगंधी शोभनीयमेणबत्त्या ते बनवूलागले. हळूहळू त्यांच्या मेणबत्यांनागमाहक आवर्जून खरेदीकरू लागले. ठेल्यावरहोणारी विक्री पुढे दुचाकी नंतर व्हॅनमधूनहोणे सुरु झाले.

आज जवळपास १००००विभिन्न प्रकारच्या मेणबत्त्या भावेशचीकंपनी तयार करते. त्याच्या कंपनीत काम करणारेबहुतेक सर्व कर्मचारीअंध आहेत. आतापर्यंतदेशभरातील २३०० अंधांनाभावेशच्या कंपनीच्या मार्फत प्रशिक्षण रोजगार उपलब्धकरून देण्यात आलेलाआहे. एकूण ७अंधांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्थाभावेशच्या कंपनीमार्मत महाबळेश्वर येथेसध्या उभी करण्यातआलेली आहे. त्यांनाभोजननिवास व्यवस्थेशिवाय त्यांना स्टायपेंड पण प्रशिक्षणकालावधीमधे दिलेजाते. आपापल्या गावीपरत गेल्यावर मेणबत्त्याबनविण्यासाठी आवश्यक ती मदतमार्गदर्शन सुद्धा पुरविलेजाते.

अंध व्यक्तिना डोळे नसलेतरी अंत:चक्षूंनीते जग पाहूशकतात, हेभावेशने सिद्ध करून दाखवलेआहे. या व्यवसायानेभावेशचे नाव देशातच नव्हे तर जगाच्यापाठीवर पोहोचले आहे. भावेशनेमोठ्या कठीण परिस्थितीतसुरु केलेला व्यवसाययशस्वी करून दाखवलाआहे. आज रिलायन्सइंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणिरोटरी क्लब सारखेमोठे ब्रॅण्ड्स त्यांचेनियिमत गमाहक आहेत. आजसंपूर्ण देशभरात तसेच जगातील६० देशांमध्ये त्यांच्यामेणबत्त्या निर्यात केल्या जातात. या सर्व कामातभावेशची पत्नी नीता हिचीखूपच मोलाची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज ती कंपनीचीप्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतआहे. दृष्टीहीन तरुणांनास्वावलंबी बनविणे हे नीताआणि भावेश यांनीआपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानलेआहे तेत्यासाठी सतत प्रयत्नरतआहेत.

भावेश गोंदियाला शाळा शिकतअसतांनाच त्याची दृष्टी कमीव्हायला लागली होती. मात्रभावेश लहानपणापासूनच धाडसीस्वभावाचा होता. सायकल चालविणे, आसपासच्या टेकड्याडोंगर चढणे, मनापासून निसर्गाचा आनंद आस्वाद घेणे हात्याचा स्वभाव होता. १९८८साली वयाच्या सतराव्यावर्षी अकरावीला असतांनात्याने ठरविले की राष्ट्रीयएकात्मता हा विषयघेवून गोंदिया तेकाठमांडूनेपाळ अशी सायकलनेयात्रा करायची. त्याच्यासोबत पोलिओझाल्यामुळे पायांमध्ये ताकद नसणारात्याचा मित्र पम्मी मोदी दिनेश पटेलहा डोळस मित्र पण तयार झाला. त्यांनी सायकलमध्ये काही बदलकरवून दोन पायडल काही गिअर्सबसवून घेतले. पायवापरु शकणारात्याचा मित्र पम्मी समोरबसून हँडल पकडायचा. भावेशला दिसत नसल्यामुळेतो मागे बसायचा पायडल मारायचेकाम करायचा. अशीडबलसीट साकयल चालविण्यासाठी बराचकाळ त्यांनी सरावकेलेला. गोंदिया ते काठमांडू परत अशी५६२० किमीची सायकलयात्रात्यांनी ४५ दिवसातपूर्ण केली. दिनेशपटेल हा डोळस मित्र पण दुसऱ्या सायकलवरत्यांच्यासोबत यात्रेमध्ये होता. यासायकल यात्रे दरम्यानभावेशच्या पुढील आयुष्यातील वाटचालीचीबरीचशी बीजे रुजल्यागेलीत. या जगामध्येचांगुलपणा सगळीकडे ठासून भरलेलाआहे, वाईट माणसांचीसंख्या ही चांगल्यांच्यातुलनेत खूपच कमीआहे हे तोशिकला. नाना प्रकारच्याअडचणींना सामोरे कसे जावे, आपल्या उद्दीष्टांसाठी पैशांची जुळवाजुळव कशीकरावी, लोकांचे सहकार्य कसे मिळवावे . शिकलेल्याअनेक गोष्टी पुढीलआयुष्यात त्याला उपयोगी पडल्यात.

१९९९ साली भावेशनेप्रथमच दिव्यांगांसाठी जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रिडास्पर्धेमध्ये वाच २८व्या वर्षी भागघेतला. सातारा जिल्हास्तरावरील यास्पर्धेमध्ये त्याने अनेक क्रिडाप्रकारांमध्येसहभाग नोंदवला तेथून त्याच्या क्रिडा क्षेत्रातील वाटचालीला सुरुवात झाली. आतार्पंयत थालीफेक, गोळाफेक भालाफेक यामध्ये त्याने राज्य राष्ट्रीय स्तरावरील११४ पदके प्राप्तकेलेली आहेत. नुकतीच त्याची२०२० साली टोकिओयेथे होणार्यापॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या देशातर्फे निवड झालेली आहे. देशासाठी सुवर्णपदक आणण्याचा त्याचासंकल्प असून त्यासाठीतयारी सुरू केलेलीआहे. एकीकडे आपल्यासनराईज कॅन्डल या कंपनीलाभरभराटीला घेवून जात असतांना, सोबतच त्याची यास्पर्धांसाठीची तयारी पण तेवढ्याचजोमाने सुरु आहे

२००८ मध्ये वयाच्या चाळीशीमध्येते काश्मीरला श्रीनगरसोनमर्गकारगिलला गेलेअसता, हिमालयाच्या शिखरांनीत्याला साद दिली. लहानपणी जवळपास डोंगरांवर चढण्याचाउद्योग भरपूर केलेला. आतावयाच्या चाळीशीनंतर पुन्हा मित्रांसोबतट्रेकिंग गिर्यारोहणालासुरुवात केली. आतापर्यंत सह्याद्रीपर्वताचे सर्वात उंच शिखरकळसूबाई सहा वेळाचढून झाले. हिमालातीलकांगरा हे ६१२०मीटर उंचीचे शिखरपण काबीज झाले. आता पुढची चढाईही ६७५० मीटरउंचीच्या मीरा याशिखरावर होणार आहे. २०१९मध्ये जगातील सर्वातउंच शिखर माऊंटएव्हरेस्ट काबीज करण्याचा भावेशचासंकल्प आहे. त्यावेळीबहुधा तो माऊंटएव्हरेस्ट चढून जाणाराजगातील पहिला दृष्टीहिन व्यक्तीअसेल.

सन २०१९ चीमाऊंट एव्हरेस्ट मोहिम २०२० मधीलटोकिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठीसुवर्णपदक या ध्येयासाठीभावेश स्वत:लातयार करतो आहे. त्यासाठी त्याचा दररोजमैदानावर कठोर परिश्रम सराव सुरुअसतो. रोज १० किमीधावणे, ५०० पुशअप्स शारिरिक तंदुरुस्तीसाठीचीअन्य साधना त्याचीअव्याहतपणे सुरु आहे. पोलो मैदानावर धावण्याच्यासरावासाठी त्याची पत्नी नीता गाडीड्राईव्ह करते, गाडीला मागेएक १५ मुटाचादोर बांधलेला असतो, तो हातात धरुनभावेशने गाडीच्या मागे धावायचेअशी त्याची दररोजचीसर्कस सुरु असते. भावेश गमतीने सांगतोकी मला माझ्यापत्नीशी खूप सांभाळूनवागावे लागते. कारण एखादंदिवशी काही कमीअधिकझाले तर सकाळीधावतांना ती गाडीचावेग वाढवून देणचाधोका असतो !
एकदा रिलायन्सतर्फे भावेशचा सत्कार केलागेला त्यालामदत म्हणून ५१लाखांचा चेक दिलागेला. भावेशने तो नम्रपणे परत केला त्याऐवजी रिलायन्सनेत्याला काम द्यावेअशी विनंती केली. अशाप्रकारे दिलेला चेक नाकारणारीव्यक्ती कदाचित रिलान्सला पणक्वचितच भेटली असावी. बर्याच बैठकांनंतरभावेशच्या कंपनीला रिलायन्सकडून काम मिळाले नंतर त्यांच्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारावर दरवर्षीच मिळत गेले. त्या नाकारलेल्या ५१लाखांच्या चेकच्या बदल्यात गेल्याकाही वर्षात त्यानेरिलायन्सकडून कैक कोटीरुपयांच्या आर्डर्स मिळवून पूर्णकेल्यात; यामध्ये भावेशची दूरदृष्टी भक्कम व्यावसायिकदृष्टीकोन लक्षात येतो.

मेणबत्या तयार करतांनाजे मेण वायाजायचे त्याचे कायकरावे हा मोठाप्रश्न त्यांच्यापुढे होता. कारण अशाप्रकारच्या वेस्टेज मेणाने गोदामेभरलेली होती. बऱ्याविचारांती त्यांनी यापासूनपुन्हा नविन मेणबत्यातयार करायला घेतल्यात. पण त्यामध्ये विविधप्रकारचे रंग प्रकार असल्याने तेसगळे एकत्र मिसळल्यागेल्याने त्यापासून बनविलेल्या मेणबत्यादिसायला चांगल्या नव्हत्या. पुन्हाविचारचिंतन सुरुझाले. शेवटी त्यामध्येकाळा रंग मिसळूनसंपूर्ण काळ्या रंगाच्या मेणबत्त्यातयार करण्यात आल्यात त्या विक्रीसाठीदुकानांमध्ये पाठविल्यात. बरेच दिवसझालेत तरी त्यातशाच पडून होत्या. काळ्या रंगामुळे त्यांना ग्राहक मिळेना. पुन्हा भावेशची चौकटीबाहेरविचार करण्याची सवयकामी आली. त्यानेअसा प्रचार करणेसुरू केले कीया काळ्या रंगाच्यामेणबत्त्या वातावरणातील सर्व नकारात्मकगोष्टींना दूर ठेवतात! आणि झाले ! ज्यामेणबत्त्यांना एकही ग्राहक घेत नव्हता, त्यामेणबत्त्यांना इतकी मागणीआली की पुढलेकाही महिने त्यांनाबाकी सर्व कामेबंद ठेवून, केवळवेस्टेजमधूनच नाही, तर नविनमेणापासून फक्त काळ्यारंगाच्याच मेणबत्त्या बनवाव्या लागल्यात.  
भावेशच्या वाटचालीत त्याची पत्नीनीता हिचा पणबरोबरीचा वाटा आहे. तिने भावेशकडे तोदृष्टीहिन आहे अशानजरेने कधीच बघितलेले/वागवलेले नाही. त्यामुळेपण स्वत:च्यादृष्टीहिनतेच्या मर्यादांवर मात करण्यासाठी एक नॉर्मलव्यक्ती म्हणून जगण्यासाठी भावेशलामोलाची मदत झाली. नीताचा खंबीर पाठिंबा आयुष्यातील प्रत्येक वळणावर असलेलीभक्कम सोबत यांच्याचआधारे, एरव्ही डोळस व्यक्तीपण धजावणार नाही, अशा प्रकारची नवनवीनआव्हाने तो स्विकारू यशस्वी करूशकला.
महाबळेश्वरयेथील त्यांच्या कंपनीमधेतुम्ही त्यांचं काम पाहूशकता. तसेच त्यांनीआता महाबळेश्वर येथेवैक्स म्युझियम पणतयार केलेले आहे अनेक थोरव्यक्तींचे मेणाचे पुतळे यासंग्रहालयात तयार केलेलेआहेत.

एवढे सगळे यश मिळवूनसुद्धा भावेश व नीता दोघेही अत्यंत नम्र, गोड व प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेले आहेत. त्यांना मिळालेल्या सर्वच गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये कृतज्ञताभाव, जो हल्ली दुर्मिळ झालेला आहे, अगदी ठासून भरलेला आहे व कदाचित एवढ्या उत्तुंग यशामागे ते एक महत्वाचे कारण असावे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह..
Categories
Ageing Avinash Saoji calories camp Diet Fats Fitness Life Style motivation Nutrition Obesity Overweight Positive Health Prayas Sevankur Weight Loss Weight Management Yoga youth Zero oil recipes

उपाशी न राहता वजन कमी करा.

उपाशी न राहता वजन कमी करा. 
काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या 
१. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर जेवण संपवून ताटावरुन उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे ताटावर बसा. म्हणजेच हळूहळू जेवा. जास्त वेळा चावून खा. ३२ वेळा चावण्याचा नियम पाळा. त्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाले     तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधानी पावते व कमी जेवूनही पोट भरल्याचे समाधान होते. जेवण आपोआपच कमी होते व वजन कमी व्हायला मदत होते.

२. चव समजणार्‍या ग्रंथी जीभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जीभेच्या या भागावर जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जीभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जीभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसण खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय ! त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वांसह अन्नाचा आस्वाद घेणे महत्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन जेवण केल्यास सुध्दा खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.

३. आपले पोट-जठर हे volume Sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरल्या जाणे महत्वाचे. कारण ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणार्‍या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाद, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे.

४. जेवण करतांना रोज हॉटेलमध्ये बसून जेवण घेतो आहोत असे समजून जेवायचे. म्हणून हॉटेलसारखे प्रथम फक्त वाटीभर सूप वा ताक प्यायचे. नंतर सलादची डीश संपवायची. एखादी वाटी अंकुरित कडधान्य खावून घ्यायचे. त्यानंतरच मुख्य जेवण – वरण, भात, भाजी, पोळी वाढून घ्यायचे व पोट भरुन जेवायचे. म्हणजे मग उपाशी न राहताही वजन कमी करता येईल. मग जेवतांना किती खावू असा विचार करण्याची फारशी गरज राहणार नाही.  

५. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षा ही जास्त वाढते. जेवण कमी न करता सुध्दा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजी पण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. तेल-तूप व साखर गूळ व हे ज्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ मुख्यत्वे मोजून खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारशे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत. 

६. एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.

७. वजन कमी करतांना फार घाई करु नये. साधारणत: दर आठवड्याला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे. 

८. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वांसाठीच हितकर असल्याने, घरातील सर्वांनीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील.  

९. वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्य त्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करुन स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही.

१०. शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताण ही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्वाचे असते. 

आहार शास्त्राचे काही मूलभूत नियम पाळणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.
अ. रोजची दोन जेवणे व नाश्ता इत्यादींमध्ये खालीलपैकी प्रत्येक गटातील एक पदार्थ असणे गरजेचे आहे.
         १. धान्य- गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बारी
         २. द्विदल धान्ये – डाळी वा उसळी- तूर, चना, मूग, मटकी, बरबटी, उडीद
         ३. पालेभाज्या व ङ्गळभाज्या व ङ्गळे
         ४. उर्जा देणारे पदार्थ- स्निग्ध पदार्थ – तेल, तूप, लोणी, व साखर, गूळ
         ५. प्राणीज पदार्थ = दूध, दही, ताक  वा मांसाहारी पदार्थ – अंडी, मासे, मटन

ब. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी उपयुक्त राहील. कच्चा भाजीपाला सलादच्या स्वरुपात भरपूर खाल्ला पाहिजे. भाज्या कमीत कमी शिजवायला पाहिजेत. गाजर मूळा, काकडी, पत्तागोबी, मेथी, कांदा इत्यादि पदार्थ किसून त्यात चवीसाठी जीरा पूड, साखर, मीठ, दही घेतल्यास उत्तम,

क. जेवणामध्ये जास्त उर्जेचा साठा असणारे पदार्थ हे कमीच असावेत.

ड. आपली स्निग्ध पदार्थाची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणारे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. मसालेदार तर्रीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बरेचदा वरुन घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्ध पदार्थांचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रुपांतर होते व वजन वाढते.

हे झाले दिसणार्‍या स्वरुपातील स्निग्ध पदार्थांबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्ध पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई इ. हे पण रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचा हिशोब करतांना मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात.

यावर खात्रीलायकरित्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीत जास्त माणशी ६०० मिली असा हिशोब करुनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढ्यातच सर्व भागवावे.
साखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्राम  साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील.

ताजे व स्वच्छ अन्न : दिर्घायू व निरोगी जगण्यासाठी अन्नपदार्थांबाबत ही दोन तत्वे महत्वाची. ताजे म्हणजे निसर्गामध्ये तयार झालेल्या मूळ अवस्थेत अन्न पदार्थ वापरणे. निसर्गात तयार झालेल्या वस्तू फार काळ टिकत नाही. त्या टिकाव्यात म्हणून त्यावर नाना प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. उदा. कैर्‍या वर्षभर खाता याव्यात म्हणून लोणचे बनवून टिकवावे लागते. तेल जास्त दिवस चांगले रहावे यासाठी रिफाईनिंग सारख्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. तांदूळ जास्त दिवस टिकावेत म्हणून पॉलिशिंग करावे लागते. कारण पॉलिश केलेल्या तांदूळाला किड लवकर लागत नाही. पण त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य कमी होते. 
स्वच्छ म्हणजे केवळ दिसण्याच्या बाबत नाही; तर रसायनमुक्त अन्न, निसर्गात तयार झालेल्या मूळ स्वरुपातील ताजे अन्न म्हणजे स्वच्छ. कोणतेही रसायन अन्नपदार्थ तयार करण्यासाठी न वापरणे म्हणजे स्वच्छ अन्न. आज शेतीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात खते व किटकनाशकांचा वापर केला जातो की जवळपास सर्वच अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात त्यांचे अंश शिल्लक राहतात व ते आपल्या शरीरात सुध्दा जातात. ती शरीरात गेल्यावर त्यांचे नेमके काय होते, ते शरीरात किती दिवस साठविले जातात, त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात याबाबत अद्याप पावेतो तरी विज्ञानाला फारशे कळलेले नाही. पण यातील बहुतेक सर्व रसायने ही अत्यंत जहाल विषारी पदार्थ असून, त्यांचा थोडाही अंश मानवी आरोग्यासाठी घातक ठरु शकतो असे मानण्यास बराच आधार आहे. त्यामुळे रसायने न वापरता तयार झालेला भाजीपाला, फळे व इतर अन्नपदार्थ मिळविणे आरोग्यासाठी महत्वाचे. त्यासाठी मग जास्त पैसे मोजावे लागले तरी ते अंतिमत: फायद्याचेच ठरेल. 
त्याचप्रमाणे अन्नपदार्थ जास्त टिकले पाहिजेत यासाठी (शेलफ लाईफ वाढविण्यासाठी) त्यांच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यात येतात. यातील बर्‍याचशा प्रक्रिया या रासायनिक पदार्थांचा वापर करुन केल्या जातात. या रसायनांचे अंश मानवी शरीरात जातात. हे सर्व अस्वच्छ अन्न होय. ते कमीत कमी खायला हवे.
महात्मा गांधींनी एका वाक्यात आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत नाही, सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. काय खावे व काय खावू नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार !

बिनातेलाची फोडणी : आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या बनवितांना फोडणी देणे हा प्रकार असतोच. कढईतील तेल तापले की त्यामध्ये आधी मोहरी व जीरे टाकायचे. ते तडतडते व फुटायला लागते. मग त्यात हिंग, हळद व इतर मसाल्याचे पदार्थ टाकायचेत. काही वेळा लसण, अद्रक व कांदा बारीक करुन टाकल्या जातो. हे सर्व मिश्रण तेलामध्ये भाजून झाले की त्यात भाजी वा जे काही बनवायचे तो पदार्थ टाकायचा; रस्सेदार भाजी बनवायची असेल तर पाणी घालायचे, सुकी भाजी बनवायची असेल तर तशीच कोरडी शिजवायची. अशा पध्दतीने भाज्या, आमटी वा अन्य पदार्थ बनविल्या जातात. काही वेळा फोडणी तयार झाली की ती कोशिंबिर, काही भाज्या, वरण यासारख्या पदार्थावर वरुन टाकायची अशी पण पध्दत आहे. 

तेलातूपाचा एक थेंबही वापरायचा नाही, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही का असा प्रश्‍न बहुतेकांच्या मनात येतो. खरेतर पथ्य फक्त तेलातूपाचे आहे व तेवढेच फक्त वापरायचे नाही आहे. त्यामुळे तेलातूपाचे पथ्य सांगितले की बहुतेकांना ते अशक्यच वाटते. कारण तेलतूप खायचे नाही म्हणजे मग फक्त उकडलेलेच खायचे असा बहुतेकांचा समज होतो. असे उकडलेले बेचव अन्न आयुष्यभर कोण व कसे खाणार हा यक्षप्रश्‍न पडतो. तेलतूप न वापरता फोडणी देता येते व तेलाशिवाय एरव्ही फोडणीत वापरल्या जाणारे इतर सर्व पदार्थ वापरता येतात हे लगेच ध्यानात येत नाही. चव ही फक्त तेलातूपावर अवलंबून नसते तर ती फोडणीसाठी वापरल्या जाणार्‍या या सर्व पदार्थांमुळे असते हा फरक चटकन ध्यानात येत नाही. 
तेला तूपाचा एक थेंब ही न वापरता भाज्या बनविता येतात ही बाब बहुतेकांना आश्‍चर्यकारक वाटते. खरेतर त्यात काहीही कठीण नसते. कधी पाहिले-ऐकलेले नसते म्हणून तसा समज आहे. यासाठी नेहमी फोडणी देतो तशीच सर्व तयारी करायची. कढई गरम करायची. मोहरी व जीरे भाजून ठेवायचे. कढई गरम झाली की हे भाजलेले मोहरी-जिरे कढईत टाकायचे. ते तडतडत फुटते. नंतर इतर गोष्टी कढईत टाकायच्यात. जसे लसण व कांदा. मंद आचेवर परतत राहत ते भाजायचे. खाली लागू नये यासाठी फारतर थोडे पाण्याचे सिपकारे मारत रहायचे. नंतर इतर गोष्टी नेहमीच्याच पध्दतीने करायच्यात. रस्सेदार भाजी असेल तर पाणी टाकल्या जातेच व खाली लागण्याचा प्रश्‍न येतच नाही. सुकी भाजी बनवायची असेल तर, कांदा वापरलेला असल्यास त्याचा चिकटपणा व ओलसरपणा यामुळे खाली भाजी लागत नाही.

अशाप्रकारे जवळपास सर्वच भाज्या बिना तेलाच्या बनविता येवू शकतात. चवीमध्ये ही काही सुध्दा फारसा फरक न पडता. दिसण्यामध्ये जरुर थोडा फरक जाणवू शकेल. चवीचा व तेलाचा संबंध आपल्या डोक्यात पक्का बसलेला असल्याने फक्त असे वाटेल. हा संबंध पूर्णपणे काढून टाकावा लागेल. 

==============


Categories
Uncategorized

सचिन बुरघाटे, अकोला…ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है!

श्री. सचिन बुरघाटेअकोला 
जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या सचिनला सातपैकी चार विषयात ३५ तर दोन विषयात ३६ मार्क्स मिळाले होते. हा आरंभबिंदू असणारा ५२३ लोकसंख्येच्या अकोला जिल्ह्यातल्या एका खेड्यातील हा मुलगा वयाच्या २५-३० मध्येच हजारो व्यावसायिकांना इंग्रजी व व्यक्तिमत्तव विकासाचे धडे देणारातरुण यशस्वी उद्योजक व प्रभावशाली वक्ता/प्रशिक्षक बनतो अशी गगनभरारी घेणाऱ्या सचिनची हि संघर्षमय व प्रेरणादायी जीवनकहाणी.  
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ५२३ वस्तीचे लाडेगाव हे सचिनचे गाव. आईवडील जेमतेम दुसरा वर्ग शिकलेले. इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेले सरकारी झोपडीवजा घर. इतरांच्या शेतात कामाला जाऊन रोजीरोटी कमविणे; जोड म्हणून सचिनच्या वडिलांनी एक छोटेसे घरगुती किराणा दुकान पण सुरु केलेले. सचिन गावच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात अगदीच सर्वसाधारण व इतरही कुठल्याच बाबतीत काही विशेष सांगावे अशी ओळख नसलेला सचिन कसाबसा ३५ टक्के मार्क मिळवून सातवी पास झाला. तो आठवीत असताना घडलेल्या एका छोट्याशा घटनेने त्याच्या आयुष्यात बदलाला सुरुवात झाली असे तो सांगतो. त्याच्या गणिताच्या शिक्षकांनी त्याला पुढे बोलावून एक गणित सोडवून दाखविले व आता तू हे इतर मुलांना समजावून सांग असे सांगितले. बस, एवढेसे प्रोत्साहन सचिनसाठी ठिणगी ठरले. त्याला वाटले कि ज्याअर्थी शिक्षकांनी मला हे करायला सांगितले याचा अर्थ मला गणित येते व आपण काही स्वतःला समजतो तसे अगदीच टाकाऊ नाही आहोत. त्या दिवसापासून आपल्यामध्ये काहीतरी वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले. तो नेटाने अभ्यास करायला लागला व दहावीला चक्क ५५ टक्के मार्क्स घेऊन पास झाला. एवढे मार्क्स मिळविणे म्हणजे त्याच्या दृष्टीने बरीच मोठी प्रगती होती. 
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अभ्यासात हुशार असलेल्या लहान भावाने शिक्षण घ्यावे व सचिनने घरचे किराणा दुकान सांभाळावे असे वडिलांनी सुचविले. किराणा सामान आणण्यासाठी एवीतेवी १०-१२ किमी अंतरावरच्या तालुक्याच्या गावी सायकलने जावे लागायचे. मग तेथे असलेल्या महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घ्यावा असा त्याने विचार केला. सकाळी ११ पर्यंत दुकान चालवायचे, त्यानंतर अकोटला येऊन कॉलेज करायचे व परत जाताना दुकानासाठी लागणारे किराणा सामान घेऊन जायचे व संध्याकाळी पुन्हा दुकान चालवायचे, अशी व्यवस्था होऊन सचिनचे शिक्षण सुरु राहिले. त्याचे गणित जरा बरे असल्याने व दुकान चालवीत असल्याने अकाउंट्स या विषयात त्याला आवड निर्माण झाली. अकरावीला सत्र परीक्षेत एका विषयात त्याचा वर्गातून पहिला नंबर येऊन १० रुपयांचे पेन त्याला बक्षीस मिळाले. सचिन सांगतो, “ऊस दिन जैसेही सरने ये घोषित किया कि मेरा पहला नंबर आया है और बक्षीस लेने हेतू मुझे सामने बुलाया तब जिंदगीमें पहली बार अपने आपसे मुलाकात हो गई. ज्यादातर हमें तो अपने आपसे मिलनेका समय हि नही मिलता, इसीलिये हमे खुदकी हि असली पहचान नही होती है”. या नवीन ओळखीमुळे सचिनची अभ्यासाची गोडी वाढली. बारावीत त्याला खूपच चांगले मार्क्स मिळालेत. त्यावेळच्या रूढीप्रमाणे त्याने डीएड करावे असा आग्रह वडिलांनी धरला व त्याला नागपूरला प्रवेश दिला. मात्र सचिनचे मन त्यात रमले नाही व दोन महिन्यातच तो हट्टाने डीएड सोडून घरी परत आला. त्यामुळे रागावलेल्या वडिलांनी त्याच्याशी बोलणेच बंद केले. वडिलांचे आपल्याबद्दल झालेले हे नकारात्मक मत कधीतरी बदलावे यासाठी जिद्दीने तो पेटून निघाला व आमूलाग्र बदलला. मात्र वडिलांचे मत बदलण्यासाठी त्याला सहा वर्षे वाट बघावी लागली. 
सचिनने अकोटलाच बीकॉमला प्रवेश घेतला. येथेच त्याने आयुष्यातील पहिले भाषण दिले. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला व सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तो इंग्रजीमध्ये करायला लागला.  लवकरच वक्ता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पुढच्या शिक्षणासाठी थोडे पैसे मिळावेत यासाठी त्याने याच काळात एसपीएस कोचिंग क्लास सुरु केला. त्याच्या शिकविण्याचा अनेकांना फायदा होत गेला व जर सचिनने शिकविले तर कोणी नापास होणार नाही अशी त्याची ख्याती झाली. बीकॉम पूर्ण झाल्यावर पुण्याला एमबीए करायला जाण्याचे ठरविले. पैशांची बोंब होतीच. मित्र-परिचितांकडून पैसे जमा करून जाण्याची सोय झाली. दीड वर्षे केवळ एकवेळचे खाऊन शिक्षण पूर्ण केले. आळंदी रोडवरच्या गजानन महाराज मंदिरात आरतीनंतर प्रसाद म्हणून खिचडी मिळायची, म्हणून तो व त्याचा मित्र दर गुरुवारी प्रसादाच्या रांगेत उभे राहून मिळालेल्या प्रसादामध्ये पोटाची भूक भागवू लागले. मात्र पुढे नोकरी मिळाली व पहिला पगार मिळाला तेंव्हा पण ते रांगेमध्ये उभे होते, फक्त त्यादिवशी आजचे अन्नदाते म्हणून सचीन व त्याच्या मित्राचे नाव समोर बोर्डावर लिहिलेले होते. आपल्याला मिळालेले काही अंशी समाजाला परत करण्याची वृत्ती तेंव्हापासूनच त्याच्यामध्ये जोपासल्या गेली. 
दोन वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर मात्र आपल्या भागातील लोकांना आपली जास्त गरज आहे व शिकविणे हि आपली प्याशन आहे हे लक्षात आल्याने २००९ साली नोकरी सोडून अकोला येथे परत येण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. इंग्रजी भाषेची भीती घालविण्यासाठी व केवळ इंग्रजी येत नसल्याने आत्मविश्वास कमी राहतो व इतर सर्वकाही असूनही आपण मागे पडतो या स्वतःच्या वाटचालीतील अनुभवामुळे त्याने अकोल्याला इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी अस्पायर‘ नावाची संस्था सुरु केली. भाषा शिक्षणाची सहज पचनी न पडणारी हि त्यावेळची सर्वस्वी नवीन संकल्पना, २००९ मध्ये केवळ १३ प्रशिक्षणार्थीना घेऊन सुरु झालेला प्रवास, आज रोजचे १५००-२००० विद्यार्थी येथपर्यंत येऊन पोहचला आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये ‘अस्पायर‘ द्वारा ४०००० डॉक्टर्सवकील, सीएगृहिणीज्येठ नागरिक व विद्यार्थी अश्या सर्वानाच इंग्रजी भाषा व सॉफ्ट स्किलसचे प्रशिक्षण दिले गेले आहे. केवळ जिद्दआत्मविश्वास व अफाट मेहनतीच्या जोरावर हे शक्य झाले आहे. आज सचिन हजारोंचा आयकॉन बनलेला आहे. त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तीनही पिढ्याचे प्रतिनिधी असतात. यातून अनेकांची आयुष्य बदलू शकलीत. सामान्य लोकांनाही शक्य व्हावे यासाठी अतिशय माफक शुल्क आकारून अस्पायरअनेकांचे आयुष्य बदलन्याचे काम करीत आहे.  
देश विदेशातील तीन लाखपेक्षाही जास्त श्रोत्यांसमोर व तेही मुख्यत्वे इंग्रजी/हिंदी भाषेमध्ये विविध विषयावर मुख्य वक्ता म्हणून सचिन बोललेला. स्वतःच्याच गावात तिकीट लावून नियमितपणे हजारो लोक त्याचे भाषण ऐकायला येतात, कदाचित कुठल्याच वक्त्याला न जमलेला हा चमत्कार त्याने करून दाखविलेला आहे.  
तिशीमध्येच एवढे मोठे यश मिळवूनही, सचिन आताही अतिशय विनम्र व सौजन्यशील आहे. उलट सामाजिक बांधिलकीसुद्धा जपतगावांमधील शेकडो गरीब मुलामुलींना विविध प्रकारे स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तो सातत्याने मदत-मार्गदर्शन करीत असतो.
समजत नसणाऱ्या वयात कधीतरी त्याला विचारल्या गेलेल्या तू कशासाठी जन्म घेतलाय या प्रश्नाचे त्याने त्यावेळी दिलेले उत्तर पुढील आयुष्यात खरे करून दाखविले. ते उत्तर होते ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है, ऊस अधूरेपन को दूर करने के लिये हम पैदा हुए है” 

संपर्क :
Aspire- The Institute of Human Development Sahakar Nagar, Gaurakshan Road, Akola
Office: 8275726017/16
Email: sachinburghate@gmail.com
URL: www.aspire.ihd.com

Categories
Uncategorized

स्वयंसेवी संस्था : निधीसंकलन/देणग्या कशा मिळवाव्यात (Fund raising & Social Empowerment of NGOs)

स्वयंसेवी संस्थाना नेहमीच जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत काय उपाय करावेत, निधीसंकलन/देणग्या कशा मिळवाव्यात, यासंदर्भात उपयुक्त माहिती.* (डॉ. अविनाश सावजी, प्रयास, अमरावती यांचे पुणे येथील राज्य स्तरीय संस्था व्यवस्थापन कार्यशाळेमधील सत्र)
Dr. Avinash Saoji, Director PRAYAS, Amravati : Speech given in a 2 days NGOs Capacity Building Workshop at MIT Pune. He had given tips regarding the crucial issue of Fund Raising for NGOs & also about social entrepreneurship.

Categories
Uncategorized

मधमाशांचे तारणहार : गोपाल पालीवाल, वर्धा

एकही मधमाशी न मारता व एकही मधमाशांचे पोळे न जाळता/नष्ट न करता, पर्यावरणपूरक मधसंकलनाचे नविन तंत्र विकसित केलेले व देशभरात हजारो आदिवासी व ग्रामीण तरुणांना त्याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याचे अतिशय महत्वाचे काम वर्धा येथील संशोधक श्री गोपाल पालीवाल यांनी केलेले आहे. त्यांनी वर्धा जिल्हयातील आग्यामोहोळाच्या मधमाशीचा मेंदू व जननसंस्था या विषयामध्ये पी.एच.डी. केलेले. मुळात मध हा काही सर्वसामान्यांचा दैनंदिन विषय नाही. त्यातही आग्यामोहोळ तर अगदीच नजरेच्या पलीकडला विषय. मात्र मधापेक्षाही एकूणच शेती व जंगलातील परागीकरणाचे अत्यंत महत्वाचे काम या मधमाशा करीत असतात व म्हणूनच आपल्या सर्व अन्नसाखळीमध्ये त्यांचे अतिशय महत्वाचे स्थान आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहितीच नसते. अशा तुलनेने अपरिचित व दुर्लक्षित विषयात त्यांनी मूलभूत संशोधन केलेले. त्यांच्या या संशोधनाचा परिणाम म्हणून व त्यांनी शोधून काढलेल्या मधसंकलनाच्या नवीन पद्धतीमुळे ३० हजार मधमाशांचे नैसर्गिक पोळे, जाळण्या/नष्ट होण्यापासून वाचले जातात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओरीसा इ. राज्यांमधील एकूण २७ जिल्हयांमधील, २४ संस्थांच्या माध्यमातून त्यांनी २२०० आदिवासी व ग्रामीण तरुणांना पर्यावरणपूरक मधसंकलन तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या. परिणामी या सर्व ठिकाणाहून दरवर्षी साडेसतरा कोटी रुपये बाजारमूल्य असलेले १२०० ते १५०० क्विंटल मध संकलित केल्या जाते. तर केवळ मधसंकलनच्या कामाचा मोबदला म्हणून जवळपास एक कोटी रुपयांचा रोजगार या आदिवासी व ग्रामीण तरुणांना उपलब्ध झाला आहे.
त्यांच्या या विषयातील प्रवेशाला निमित्त ठरले ते नागपूरला एमएस्सी झाल्यानंतर त्यांच्या शिक्षकांकडून त्यांना वर्धेच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र या विज्ञान तंत्रज्ञान विषयात काम करणाऱ्या संस्थेमध्ये फेलो म्हणून काम करण्याबाबत सुचविले गेलेले. पाच वर्षे गोपाळने तेथे काम केले व पीएचडीचे कामही सुरु होते. ५-६ राज्यात फिरणे झाले. या प्रवासात त्याने बघितले कि सर्वत्र मध गोळा करणारे अत्यंत क्रूर पद्धतीने मध गोळा करतात. मधमाशांच्या पोळ्याला आग लावली जाते, ज्यात हजारो मधमाशा मरतात; त्यांचे पोळे खाली पाडले गेल्याने त्यांचे घर कायमचे नष्ट होते. अशा रीतीने गोळा होणाऱ्या मधाचे प्रमाणही खूपच कमी असते. हे सर्व बदलण्याचा गोपाळने निश्चय केला.
पीएचडी पूर्ण झाल्यावर पुढे त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या ५०० लोकवस्तीच्या पूर्णतः आदिवासी गावाशी संबंध आला व तेथूनच खऱ्या अर्थाने मधसंकलनाच्या नवीन पद्धतीचा शोध सुरु झाला. मेंढालेखा हे गाव “दिल्ली मुंबईत आमचे सरकार व आमच्या गावात आम्हीच सरकार” या घोषणेने जगाच्या नकाशावर प्रसिद्धीला आलेले. ग्रामस्वराज्याचे विविध प्रयोग या गावात “देवाजी तोफा” या आदिवासी कार्यकर्त्याचा नेतृत्वात गावाने केलेले. गोपाळ जंगल अभ्यास गटाच्या निमित्ताने या गावाशी याकाळात जोडल्या गेला. यादरम्यान मध संकलनाची प्रचलित अघोरी पद्धत बदलण्याच्या दृष्टीने स्थानिक आदिवासी तरुणासोबत एकत्रितपणे अनेक प्रयोग केले गेलेत. त्यातून एक नवीन प्रकारचा ड्रेस, जो आज देशभरात मध संकलन करणारे वापरतात त्याचा शोध लागला. सर्वांग झाकून टाकणारा व शरीराला फिट बसणार हा ड्रेस एका विशिष्ट्य जाड मटेरिअलपासून बनविलेला, ज्यामधून मधमाशीचा डंख होऊ शकणार नाही याप्रकारे बनविल्या गेलेला. झाडावर वावरताना सहज व सोपा असा तो झाला. तसेच चढण्यासाठी दोराचा वापर करण्याचे पद्धती पण येथे प्रथमच सुरु केली गेली. त्याआधी झाडावर तसेच चढून मध काढल्या जायचे व त्यात कित्येक संकलक झाडावरून खाली पडून जखमी व्हायचेय, ते दोर वापरल्याने जवळपास थांबलेच. तिसरा बदल जो त्यांनी केला तो मधमाशीचे पोळे न जाळता व नष्ट न करता केवळ पोळ्याच्या वरच्या ७० % भाग अलगद कापून घेऊन उर्वरित खालचा ३० % भाग हा तसाच कायम ठेवून द्यायचा. कारण मधाचा साठा हा फक्त पोळ्याच्या या वरच्या भागात असतो, तर खालच्या भागात माशांचे निवासस्थान असते. त्यामुळे माशांच्या घरांना अजिबात धक्का न लावता फक्त मधाचा साठा तेवढा काढून घेण्याची नवी पद्धत शोधल्या गेल्याने एकही मधमाशी मारण्याची गरज राहिली नाही. पोळेही कायम राहिल्याने या माशा महिन्याभरातच पुन्हा मधसंकलन करून वरचा मधाचा साठा पूर्ववत भरून काढतात. त्यामुळे एकाच पोळ्यापासून मधाचे किमान तीन वेळा संकलन करता येऊन उत्पादनातही भर पडली. आज देशभरात या पद्धतीनेच मध संकलित केला जातो.
मधमाश्यांचे जीवन/त्यांचे वर्तन आणि पर्यावरण पूरक मधसंकलन तंत्रज्ञान या संदर्भात अनेक राष्ट्रीय/आतंरराष्ट्रीय कार्यशाळा व संमेलनांमध्ये तसेच आग्यामोहोळच्या मधाबाबत प्रचार व प्रसारसाठी अनेक स्थानिक/ राष्ट्रीय/ आतंरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय मेळ्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. व्हिएतनाम, हॉलन्ड, जर्मनी, ब्राझील इ. देशांमध्ये मधमाशांबद्दल सल्लागार/ अभ्यासक म्हणून त्यांनी दौरे केलेले आहेत. तसेच राष्ट्रीय कारीगर पंचायत, मध्यवर्ती मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, WWF, डिपार्टमेन्ट ऑफ सायन्स ऍन्ड टेकनॉलॉजी इ. अनेेक संस्था/विभागांशी निगडीत असलेले गोपाल पालीवाल यांनी, स्वत:च्या कामाद्वारे इतरांना रोजगार व नवी दिशा देण्याचा आदर्श उभा केला.
संपर्क :  गोपाळ पालीवाल, ९, देशपांडे लेआऊट, नालवाडी, वर्धा मोबा. ९४२३४२०४८५

Categories
Uncategorized

“देवा.. खेळ मांडला”.. तेजस नाईक, जळगाव

देवा.. खेळ मांडला“..

२०१२ मध्ये जळगावच्या बालगंधर्व या खुल्या नाट्यगृहात झालेल्या प्रयासच्या पहिल्याच “सेवांकुर लिटल चॅम्प्स” या अत्यंत प्रेरणादायी स्टेज-शो कार्यक्रमात श्रोता म्हणून आठवीत असलेला तेजस नाईक त्याच्या आईसोबत आलेला होता. कुणीतरी मला त्याच्याबद्दल सांगितले. मी त्याला ५ मिनिटांसाठी एका बाजूला बोलवून घेतले व त्याच्याशी बोललो. लगेच त्याला व त्याच्या आईला स्टेजवर कार्यक्रमामध्ये सादरीकरणासाठी बोलावून घेतले. त्याला व त्याच्या आईला त्यांची कहाणी शेअर करायला सांगितले. जाहीरपणे एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर स्वतःची कहाणी सांगण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तेजसने आपली कहाणी सांगितली. त्याच्या आईनेही त्या सगळ्या आठवणी डोळ्यातील अश्रूंसह जागविल्यात. चौथ्या वर्गात असताना त्याला चिकनगुनिया झाला व त्यातच संपूर्ण शरीरातील स्नायूंची ताकद कमी होत गेली. पुण्याला तो पन्नास दिवस अति गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती होता. हळूहळू तो त्यातून बरा झाला. मात्र त्याच्या डोळ्यांवर झालेला परिणाम मात्र कायमचाच राहिला व त्याची दृष्टी कमी व्हायला लागली. पुढे तर पूर्ण अंधत्वच आले. अचानक झालेल्या या आघाताने संपूर्ण घरचं सैरभैर झालेले. तेजस पण निराश झालेला. त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी पुन्हा स्वतःला समजावत त्याला गुंतविण्यासाठी संगीताचा क्लास लावून दिला. तेजसच्या मुळातच छान असलेल्या आवाजाला पैलू पडल्या गेलेत व तो गाण्यामध्ये रमत गेला. गायनातच पुढे काही करावे असे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. मी त्याला एक गाणे सादर करायला सांगितले. त्यावेळी त्याने “देवा.. खेळ मांडला”.. हे गाणे अप्रतिम सादर केले. त्यानंतर मी एकच वाक्य बोललो, तेजस एक दिवस याच खुल्या रंगमंचावर आम्ही तिकीट विकत घेऊन तुझे गाणे ऐकायला येऊ, तिथपर्यंत तुला पोहचायचे आहे; समोर बसलेल्या ४००० + प्रेक्षकांना आवाहन केले कि तेजसला तेथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. कोण तयार आहे त्यांनी हात वर करावेत, आणि अनेक हात वर आलेत. ते पाहून तेजस व त्याच्या आईला आणखीनच हिंमत आली.
“जीवनाशी लढणाऱ्या कणखर मुलांची गोष्ट” अशी संकल्पना असणाऱ्या “सेवांकुर लिटल चॅम्प्स” या कार्यक्रमात ज्यांच्या आयुष्यात खूप आव्हाने असूनही ज्यांनी हार तर मानलीच नाही, उलट काहीतरी विशेष कामगिरी करून दाखविलेली आहे अशा मुलांना बोलतं करून त्यांची लढाई सर्वांपुढे आणली जाते. पहिल्या कार्यक्रमापासूनच ३-४ हजार प्रेक्षकांची उपस्थिती मिळालेला हा कार्यक्रम पुढे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला व प्रत्येक ठिकाणी असाच प्रतिसाद मिळालेला. हा कार्यक्रम पाहून, त्याच्या डीव्हीडी पाहून हजारोंच्या आयुष्यातील निराशा दूर व्हायला मदत झाली. काहींनी तर आता आत्महत्येचा बेत कॅन्सल केला येथपर्यंत प्रतिक्रिया दिल्यात. यातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, अहमदनगर, शिरपूर व इतरही अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये तेजस या कार्यक्रमाचा एक भाग राहिलेला. बहुतेक ठिकाणी त्याचे आईवडील पण सोबत असायचेत. त्याच्या आवाजातील “देवा.. खेळ मांडला”.. हे गाणे मला अतिशय आवडायचे व दरवेळी मी त्याला ते गाणे म्हणायला लावायचो.
तेजस सामान्य मुलांच्या सोबतच जळगावच्या एका शाळेत शिकला. प्रत्येक वर्षी, शाळेतील तीन तुकड्यांमधून तो कायम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचा. दहावीला तर त्याला ८५ % गुण मिळालेत. पुढे अकरावी बारावीमध्येही संगीतामधील त्याचे शिक्षण व प्रगती सुरूच होती. अनेक ठिकाणी त्याला कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी निमंत्रणे यायला लागलीत. एकदा तर प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरीं समोर त्याचे गाणे झालेले आणि आतातर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचेसोबत पण त्याला गाण्याची संधी मिळणार होती, इतक्या उंचीवर तो संगीतामध्ये पोहचलेला होता.
अमरावती येथे दरवर्षी होणाऱ्या स्पार्क या प्रयासच्या निवासी उन्हाळी शिबिरात तो अकरावीला असताना सहभागी झालेला. त्यापूर्वी त्याच्या आईने त्याला स्वतःच्या आईकडेसुद्धा एका रात्रीसाठी पण एकटे ठेवलेले नव्हते. पण या शिबिरात मात्र निश्चितपणे सात दिवसांसाठी त्याला एकट्याला सोडून त्या गेल्यात, एवढा त्यांचा प्रयासवर विश्वास होता. शिबिरामध्ये तो एकटाच दिव्यांग होता. मात्र त्याने इतर शिबिराथींच्या बरोबरीने शिबिरात झालेल्या सर्वच कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला, अगदी झाडावर चढणे, पारंब्यांना लटकून झोके घेणे, ट्रेकिंग, बाहेरच्या असाइन्मेंट्स असतील, सर्व काही केले. सात दिवसाच्या या शिबीराने त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असे त्याची आई वडील कायम सर्वाना सांगत असतात.
जळगावला असलेल्या यजुर्वेंद्र महाजनांच्या यांच्या दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेच्या, दिव्यांगांसाठी असणाऱ्या मनोबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तो आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन गेल्या दोन वर्षांपासून तयारीला लागला होता. सोबतच स्थानिक महाविद्यालयामध्ये बीए दुसऱ्या वर्षाला तो शिकत होता. आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाने तो सर्वांचा अतिशय लाडका बनला होता. त्याचा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व उंच झेप घेणारी स्वप्ने अनेकांना प्रेरणा देऊन गेलीत. 
दुर्दैवाने नियतीने पुन्हा एकदा त्याच्यावर घाला घातला व १ महिन्यापूर्वी त्याला डेंग्यूची लागण झाली. ३-४ दिवसातच आजार वाढत गेला व त्याची पुन्हा एकदा मृत्युसोबतची लढाई सुरु झाली. सुरुवातीला जळगाव व नंतर औरंगाबादला त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण दुर्दैवाने यावेळी तो हरला व दि. २७ ऑक्टोबर २०१७ ला रात्री त्याने या जगाचा निरोप घेतला. कदाचित देवाला पण त्याचे गाणे इतक्यातच ऐकायची इच्छा झाली असावी. तेजस एवढा गोड व लाघवी आहे कि परमेश्वर पण त्याला कायम आपल्या जवळ ठेवेल, यात मला अजिबात शंका नाही.
त्याचे वडील शिक्षक आहेत, तर आई गृहिणी. त्यांच्यावर ओढवलेल्या या आभाळा एवढ्या आपत्तीमधून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो एवढीच प्रार्थना…
खरेतर “आम्ही बी घडलो” या लेखमालेत तेजसबाबतचा लेख कधीतरी लिहिला जाणार होताच, पण दुर्दैवाने नुकताच त्याने या जगाचा निरोप घेतल्यामुळे त्याला या लेखाद्वारेच अखेरची श्रद्धांजली अर्पण करावी लागते आहे …. 
Categories
Uncategorized

कर्णबधिरांचा आवाज (सुचिता व श्रीकांत बनसोड, अकोला)

सुचिता व श्रीकांत बनसोड, कर्णबधिरांना बोलके करणारे जोडपे !!


लग्नानंतर १ वर्षातच जन्माला आलेल्या आपल्या मुलाला (निखिलेश) अतितीव्र प्रकारचे कर्ण बधिरत्व आहे हे तो सात महिन्याचा असतांना कळताच, त्याला पुन्हा कान प्राप्त करुन देण्याची दिर्घकालीन लढाई या जोडप्याने सुरु केली. त्यासाठी अकोला येथे त्याकाळात काही करता येण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अकोला सोडून त्याच्या उपचार व विशेष शिक्षणासाठी मुंबई गाठली. एमएससी असलेल्या सुचिता यांनी प्राध्यापकाची असलेली नोकरी सोडली. तर श्रीकांत यांनी मुंबईला बदली करवून घेतली.
निखिलेषला सुरूवातीला श्रवनयंत्र दिले गेले. पण त्याचा त्याला फारसा फायदा झाला नाही. निखिलेश हा दगड आहे व काहीही केले तरी तो आयुष्यात बोलू शकणार नाही असे दोन वर्ष सातत्याने प्रयत्न करून झाल्यावर त्यांना सांगितल गेले. पण हार मानायची नाही असा पक्का निर्धार असल्याने, त्यांनी तेथील ‘सेन्ट्रल स्कूल फॉर डेफ या शाळेत निखिलेषला बोलन्या-ऐकन्याचे प्रशिक्षणासाठी न्यायला सुरूवात केली. अडीच वर्षांच्या निखिलेश सोबत त्याची काळजी घेण्यासाठी सुचिता पण जायला लागल्यात. त्याला घेवून डोंबिवली ते भायखळा असा रोजचाच मुंबईतील चार तासांचा लोकलचा प्रवास त्यांच्यासाठी फार जड गेला. मात्र मुलाला बोलके करायचे या ध्यासापोटी हे सर्व त्यांनी स्विकारले. पुढे अशा विशेष मुलांसाठीचे बीएड व इतरही काही कोर्सेसही त्यांनी केलेत.
शेवटचा उपाय म्हणून निखिलेशची साडेसहा लाख रु खर्चाची अत्यंत महागडी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी २००४ मध्ये केली गेली. त्याकाळात आपल्या देशात ही सर्जरी फारच कमी व्हायची. मात्र सर्जरीचा त्याला उपयोग झाला व इतक्या वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे हळूहळू निखिलेश ऐकायला व बोलायला शिकला. पुढे तर तो सामान्य शाळेमध्येच शिकू लागला. 
७ वर्षांची ही प्रदिर्घ लढाई जिंकून हे जोडपे २००७ मध्ये अकोल्याला परतले. पूर्णपणे कर्णबधिरत्व असलेला निखिलेश ऐकू/बोलू लागला या चालत्याबोलत्या चमत्कार व आश्चर्याची बातमी हळूहळू परिसरात पोहोचू लागली. मग अशा प्रकारची समस्या असणारे पालक सल्ला-मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायला लागलेत. यातूनच २००८ मध्ये बालविकास केंद्र या कर्ण/मुकबधिर मुलांच्या विशेष शाळेची (६ वर्ष वा त्यापेक्षा छोटया मुलांसाठी) सुरुवात झाली. त्यांनी स्वत:च्या २ मजली घरामधील केवळ २ खोल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवून उरलेली सर्व जागा शाळेसाठी दिली. २ मुलांपासून सुरु झालेली हि शाळा आज ४५ मुलांपर्यंत जावून पोहोचली. एवढया वर्षात ४०-४५ कर्ण/मुकबधिर मुलांना बोलके करुन त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलविण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. आज ही मुले सामान्य शाळेमध्ये इतर मुलांसारखी शिकतात, स्टेजवरून भाषणे देतात, गाणी म्हणतात, नाटक सादर करतात, संस्कृत स्त्रोत्रे-श्लोक इ. म्हणतात,याला जीताजागता चमत्कार नाही तर आणखी काय म्हणणार !
कर्णबधीर मुलांना बोलके करण्याचा चमत्कार घडविणारी ही शाळा विनाअनुदानित असल्याने, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच चालविली जाते. या काळात त्यांची वहिनी पण शिक्षिकेची नोकरी सोडून सोबत आलेली. त्यांचे इंजिनियर असलेले पती श्रीकांत यांची खंबीर साथ व पाठींबा तर त्यांच्या सोबत होतेच. अत्यंत कठीण, अतिशय संथ व दिर्घकालीन प्रयत्नांची गरज असणारे हे काम करण्यासाठी लागणारा मनाचा निग्रह, संयम व सहनशीलता हे या जोडप्याचे विशेष भांडवल आहे.
बाबा हा शब्द आपल्या मुलाच्या तोंडून ऐकता यावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि ती सहजच व बहुधा कुठलाही प्रयत्नांशिवाय पूर्ण होते. सुचिता व श्रीकांत याना मात्र त्यासाठी आठवड्याला दोन तास असे सतत ८ महिने प्रयत्न करावे लागलेत. तेंव्हाही बाबा असा स्पष्ट शब्द न होता हंबा असाच उच्चार आला. तो ऐकल्यावरही त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एकेक शब्द उच्चारण शिकायला या मुलांना महिने लागतात. एवढी प्रदिर्घ मेहनत न थकता-न कंटाळता घ्यावी लागते. इतकी ही दिर्घकालीन व पालकांच्या सहनशक्तीची परिक्षा घेणारी लढाई असते. कपिल हा त्यांच्या शाळेतील असाच एक मुलगा; दररोज सहा तास शाळेत व त्याशिवाय त्याची आई घरी सकाळी २ व सायंकाळी ३ असे रोजचे ५ तास त्याला शिकवायची. याप्रमाणे सतत सात वर्ष प्रयत्न केल्यावर कपिल आता बऱ्यापैकी छान बोलू लागला. पूरवीला तर जन्मतःच हृदयाचा आजार, डोळ्यात मोतीबिंदू व कर्णबधिरत्व अशी तिहेरी देणगी मिळालेली; पण सुचिताताईंची शाळा व पूरवीच्या पालकांची मेहनत यामुळे ती आता मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषा बोलायला शिकली.  
कर्णबधिरत्वाचे जेवढ्या लवकर निदान होवून उपचार-प्रशिक्षण सुरू होईल, तेवढे चांगले परिणाम मिळतात. त्यासाठी मुलाबरोबरच पालकांचे प्रशिक्षण पण तेवढेच महत्वाचे असते. म्हणून सुचिताताईच्या शाळेत मुल आणि त्याचे पालक असे दोघेही विद्यार्थी असतात. चांगले परिणाम मिळण्यासाठी सलग काही वर्षे तरी दोघांनाही शिकावे लागते.
कर्णबधिरत्वाचे सहज निदान होत नाही. कानाने शब्दच ऐकायला येत नसल्याने बोलणे पण विकसित होत नाही. त्यामुळे त्यांना शिकण्यासाठीचे दोन महत्वाचे मार्ग बंद होतात. शिवाय कर्णबधिरत्व हे डोळ्याने सहज न दिसणारे अपंगत्व आहे. अंधत्व वा इतर शारिरिक अपंगत्व सहज दिसते व त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात थोडीफार सहानूभूती पण असते. मात्र अशी सहानूभूती कर्णबधिर मुलांना मिळत नाही. उलट त्यांच्या वाट्याला थोडीसी टिंगलटवाळी व हेटाळणीच येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे पण खूपच मोठे आव्हान असते. 
त्यांना लागणाऱ्या श्रवनयंत्राची किमत साठ हजार ते दोन लाख रू. असते. चष्म्याप्रमाणे तेही दर ३-४ वर्षांनी बदलावे लागते. शिवाय ते वापरूनही आवाजाची स्पष्टता केवळ ६० % असते. आपल्याला तर अगदी काही मिनिटे जरी आवाज स्पष्ट ऐकाला आला नाही तर वैतागायला होते. या मुलांना तर आयुष्यभरासाठीच आवाजाच्या केवळ ६० % स्पष्टतेसह ऐकायला लागते.
एवढी सगळी आव्हाने समर्थपणे पेलून एकेका कर्णबधिर मुलाचे आयुष्य बदलविण्यासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावणाऱ्या या कुटुंबाच्या पाठीशी समाजातील जाणत्यांनी उभे रहावे एवढीच अपेक्षा.

संपर्क : एकविरा बालविकास केंद्र, ज्योतीनगर, जठारपेठ, अकोला.
Mob. 9420705782, 

Add address