Categories
Author: admin
भावेश भाटिया, महाबळेश्वर
२०१० मध्ये मी, माझीपत्नी सोहिनी वमुलगा अपार सातारायेथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. एक दिवसथोडा मोकळा होताव अपारची महाबळेश्वरबघण्याची फार तीव्र इच्छा होती, म्हणूनआम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्येप्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेशभाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचेवर्कशॉप आहे, तिथे१०–१५ मिनिटांसाठीजावू व नंतरपॉईंट्स बघू या म्हणून आधी भावेशकडेगेलो. भावेश भाटियानावाच्या अतिशय गोड व्यक्तिमत्वाच्याअंध व्यक्तीची झालेली तीपहिली भेट. तेथे त्यावेळी २५० प्रकारच्या सुगंधीव डेकोरेटिव्ह मेणबत्त्यातयार केल्या जायच्यात. ते सर्व भावेशनेआम्हाला अतिशय जिव्हाळ्याने दाखविले. तो व त्याची पत्नी नीतासोबत बराच वेळ बोलत बसलो. दोन तास कसेगेलेत ते कळलेचनाही. तेथून निघतानामाझा २० वर्षांचामुलगा अपार म्हणालाकि, बाबा आतामहाबळेश्वरचे इतर पॉईंट्सनाही बघितले तरीचालेल. भावेशकडे आलो यातचसगळे महाबळेश्वर पाहण्याचाआनंद व समाधानमळाले. जो अपारअतिशय आतुरतेने महाबळेश्वरपाहण्यासाठी म्हणून उत्सुक होतात्याचे हे उद्गारहोते; आणि खरोखरचआता महाबळेश्वराच्या पॉइंट्समध्येभावेश भाटिया यांच्यासनराईज कॅण्डल व वॅक्ससंग्रहालय हा नवीनपॉईंट जोडल्या गेलेआहेत.
भावेश मुळचा कच्छमधील. वडील उपजिवीकेसाठी महाराष्ट्रातगोंदियाला आलेले. भावेशची दृष्टीशाळेत असतानापासूनच त्यालाअसलेल्या रेटिनाच्या आजारामुळे कमीकमीहोत चाललेली. शाळेतीलइतर मुले त्यालाआंधळा म्हणून चिडवायची. १५–१६ व्यावर्षी तर पूर्णतःअंधत्व आलेले. मात्र त्याची आई त्यालाम्हणायची तुला जगपहाता येत नसलेम्हणून काय झाले, असे काहीतरी करकि संपूर्ण जगतुझ्याकडे पाहायला लागेल. आईचेहे उद्गार त्याच्यासाठीकायम प्रेरणा देतराहिले. त्यामुळेच कदाचित भावेशपुढील आयुष्यात जगासाठीएक रोल मॉडेलबनला. दुर्दैवाने त्याचीआई पण याचदरम्यान कॅन्सरने गेली. तिच्याउपचारात बराच खर्चझाल्याने त्यांची आर्थिक परिस्थितीपण ढासळली होती. ते गोंदिया सोडूनमहाबळेश्वरला आलेत. तेथे उपजीविकेसाठी मिळेल ते कामकेले. भावेश लहानपणापासूनकल्पक व सृजनशीलहोता. तो खेळणी, पतंग इ. अनेक कलात्मक वस्तू बनवायचा. तो १९९९ मध्येमुंबईच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमध्येमेणबत्त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणूनगेला. पण अंधांनाहे काम जमतनाही म्हणून मेणबत्तीऐवजी त्याला मसाजिंग प्रशिक्षणालाप्रवेश देण्यात आला. मसाजचेप्रशिक्षण घेत असतानामेणबत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांनामोफत मसाजकरुन त्यांच्याकडून त्यानेमेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसातकेले. प्रशिक्षण पूर्णकरून महाबळेश्वरला परतआल्यावर तो मसाजिंगचेकाम करू लागला. पण मेणबत्ती बनविण्याचेत्याचे स्वप्न त्याला स्वस्थबसू देत नव्हते. त्याने घरच्या घरी मेणबत्त्याबनवून पाहणे सुरुकेले व बाजारात५० रु. रोजाप्रमाणेभाड्याने घेतलेल्या ठेल्यावर त्यातो विकू लागला.
एक दिवस असाच भावेशबाजारात आपल्या ठेल्यावर मेणबत्या विकत होता. त्यादिवशी महाबळेश्वरलाहवापालट करण्यासाठी म्हणून काहीदिवस रहायला आलेलीनीता नामक युवती फिरत फिरत त्याच्या ठेल्याजवळ आली. एक अंध व्यक्ती मेणबत्त्या विकतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने भावेशबद्दल सविस्तर चौकशी केली. भावेशचाप्रामाणिकपणा, जिद्द पाहून तीप्रभावित झाली व दररोज त्याच्या कामात त्याला मदतकरायला म्हणून येऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री झालीव ते प्रेमातकधी पडले हे त्यांना कळलेच नाही. दोघांनी लग्न करण्याचानिर्णय घेतला. एका अंधमेणबत्ती बनवून विकणाऱ्या गृहस्थाबरोबर, सर्व काहीव्यवस्थित असलेली नीता लग्नकरते म्हटल्यावर तिलाकुटुंबियांच्या विरोध होणे स्वाभाविकचहोते; पण नीताआपल्या निर्णयावर ठाम होती. तिने आपल्या आईवडिलांना राजी केले. वर्षभरानंतर त्यांचे लग्न झाले. लग्न करून त्यांनीमहाबळेश्वरलाच एका छोट्याशाघरात संसार थाटला. अन्न ज्या भांड्यांमध्ये शिजवायचे त्याचभांड्यात मेणबत्त्या बनविण्यासाठी मेणवितळविले जायचे. कारण त्यासाठीवेगळी नवीन भांडीखरेदी करण्याची पणत्यांची परिस्थिती नव्हती. मात्र आता नीता सोबत आल्याने भावेशच्या कामाला चांगलीच गती आली व त्यांचा व्यवसाय वाढू लागला. हळूहळूदोघांनी कष्टातून एक दुचाकीवाहन खरेदी केले. लग्नापूर्वी सायकलसुद्धा चालविता नयेणारी नीता आतादुचाकी व पुढेचारचाकी वाहन पण चालवायलाशिकली.
भावेशने सुरुवातीला अनेक मेणबत्तीनिर्माते आणि संस्थांकडूनमार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणावा तास प्रतिसाद मिळालानाही. बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांनीही नकारदिला. भावेश नीतासोबतमॉलमध्ये जाऊन तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्यांना स्पर्शकरून, त्यांचा आकारआणि बनावट समजूनघ्यायला लागला. अशाप्रकारे मेणबत्तीबनविण्याचे कौशल्य त्याने हळूहळू आपल्या कल्पकतेने विकसितकरीत नेले. पुढेएका बँकेने त्याला१५ हजार रुपयेकर्ज दिले. त्यातूनत्यांनी कच्चा माल वसाचे खरेदी केलेव सनराइज कँडल हि कंपनी सुरुकेली. आज याकंपनीचा वार्षिक टर्नओव्हर २५कोटी रुपयांपेक्षा जास्तझाला आहे. ५किलो मेणापासून सुरुवातकेलेल्या भावेशला आता दररोज १२५ क्विंटल मेणमेणबत्त्या बनविण्यासाठी लागते. मेणबत्ती बनविण्यामध्येस्वतःची कल्पकता व सृजनशीलतावापरून विविध प्रकारच आकर्षकसुगंधी व शोभनीयमेणबत्त्या ते बनवूलागले. हळूहळू त्यांच्या मेणबत्यांनागमाहक आवर्जून खरेदीकरू लागले. ठेल्यावरहोणारी विक्री पुढे दुचाकीव नंतर व्हॅनमधूनहोणे सुरु झाले.
आज जवळपास १००००विभिन्न प्रकारच्या मेणबत्त्या भावेशचीकंपनी तयार करते. त्याच्या कंपनीत काम करणारेबहुतेक सर्व कर्मचारीअंध आहेत. आतापर्यंतदेशभरातील २३०० अंधांनाभावेशच्या कंपनीच्या मार्फत प्रशिक्षणव रोजगार उपलब्धकरून देण्यात आलेलाआहे. एकूण ७०अंधांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्थाभावेशच्या कंपनीमार्मत महाबळेश्वर येथेसध्या उभी करण्यातआलेली आहे. त्यांनाभोजन–निवास व्यवस्थेशिवाय त्यांना स्टायपेंड पण प्रशिक्षणकालावधीमधे दिलेजाते. आपापल्या गावीपरत गेल्यावर मेणबत्त्याबनविण्यासाठी आवश्यक ती मदत–मार्गदर्शन सुद्धा पुरविलेजाते.
अंध व्यक्तिना डोळे नसलेतरी अंत:चक्षूंनीते जग पाहूशकतात, हेभावेशने सिद्ध करून दाखवलेआहे. या व्यवसायानेभावेशचे नाव देशातच नव्हे तर जगाच्यापाठीवर पोहोचले आहे. भावेशनेमोठ्या कठीण परिस्थितीतसुरु केलेला व्यवसाययशस्वी करून दाखवलाआहे. आज रिलायन्सइंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणिरोटरी क्लब सारखेमोठे ब्रॅण्ड्स त्यांचेनियिमत गमाहक आहेत. आजसंपूर्ण देशभरात तसेच जगातील६० देशांमध्ये त्यांच्यामेणबत्त्या निर्यात केल्या जातात. या सर्व कामातभावेशची पत्नी नीता हिचीखूपच मोलाची वमहत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज ती कंपनीचीप्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतआहे. दृष्टीहीन तरुणांनास्वावलंबी बनविणे हे नीताआणि भावेश यांनीआपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानलेआहे व तेत्यासाठी सतत प्रयत्नरतआहेत.
भावेश गोंदियाला शाळा शिकतअसतांनाच त्याची दृष्टी कमीव्हायला लागली होती. मात्रभावेश लहानपणापासूनच धाडसीस्वभावाचा होता. सायकल चालविणे, आसपासच्या टेकड्या–डोंगर चढणे, मनापासून निसर्गाचा आनंद वआस्वाद घेणे हात्याचा स्वभाव होता. १९८८साली वयाच्या सतराव्यावर्षी अकरावीला असतांनात्याने ठरविले की राष्ट्रीयएकात्मता हा विषयघेवून गोंदिया तेकाठमांडू–नेपाळ अशी सायकलनेयात्रा करायची. त्याच्यासोबत पोलिओझाल्यामुळे पायांमध्ये ताकद नसणारात्याचा मित्र पम्मी मोदीव दिनेश पटेलहा डोळस मित्र पण तयार झाला. त्यांनी सायकलमध्ये काही बदलकरवून दोन पायडलव काही गिअर्सबसवून घेतले. पायवापरु न शकणारात्याचा मित्र पम्मी समोरबसून हँडल पकडायचा. भावेशला दिसत नसल्यामुळेतो मागे बसायचाव पायडल मारायचेकाम करायचा. अशीडबलसीट साकयल चालविण्यासाठी बराचकाळ त्यांनी सरावकेलेला. गोंदिया ते काठमांडूव परत अशी५६२० किमीची सायकलयात्रात्यांनी ४५ दिवसातपूर्ण केली. दिनेशपटेल हा डोळस मित्र पण दुसऱ्या सायकलवरत्यांच्यासोबत यात्रेमध्ये होता. यासायकल यात्रे दरम्यानभावेशच्या पुढील आयुष्यातील वाटचालीचीबरीचशी बीजे रुजल्यागेलीत. या जगामध्येचांगुलपणा सगळीकडे ठासून भरलेलाआहे, वाईट माणसांचीसंख्या ही चांगल्यांच्यातुलनेत खूपच कमीआहे हे तोशिकला. नाना प्रकारच्याअडचणींना सामोरे कसे जावे, आपल्या उद्दीष्टांसाठी पैशांची जुळवाजुळव कशीकरावी, लोकांचे सहकार्य कसे मिळवावे इ. शिकलेल्याअनेक गोष्टी पुढीलआयुष्यात त्याला उपयोगी पडल्यात.
१९९९ साली भावेशनेप्रथमच दिव्यांगांसाठी जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रिडास्पर्धेमध्ये वाच २८व्या वर्षी भागघेतला. सातारा जिल्हास्तरावरील यास्पर्धेमध्ये त्याने अनेक क्रिडाप्रकारांमध्येसहभाग नोंदवला वतेथून त्याच्या क्रिडा क्षेत्रातील वाटचालीला सुरुवात झाली. आतार्पंयत थालीफेक, गोळाफेक वभालाफेक यामध्ये त्याने राज्यव राष्ट्रीय स्तरावरील११४ पदके प्राप्तकेलेली आहेत. नुकतीच त्याची२०२० साली टोकिओयेथे होणार्यापॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या देशातर्फे निवड झालेली आहे. देशासाठी सुवर्णपदक आणण्याचा त्याचासंकल्प असून त्यासाठीतयारी सुरू केलेलीआहे. एकीकडे आपल्यासनराईज कॅन्डल या कंपनीलाभरभराटीला घेवून जात असतांना, सोबतच त्याची यास्पर्धांसाठीची तयारी पण तेवढ्याचजोमाने सुरु आहे.
२००८ मध्ये वयाच्या चाळीशीमध्येते काश्मीरला श्रीनगर–सोनमर्ग–कारगिलला गेलेअसता, हिमालयाच्या शिखरांनीत्याला साद दिली. लहानपणी जवळपास डोंगरांवर चढण्याचाउद्योग भरपूर केलेला. आतावयाच्या चाळीशीनंतर पुन्हा मित्रांसोबतट्रेकिंग व गिर्यारोहणालासुरुवात केली. आतापर्यंत सह्याद्रीपर्वताचे सर्वात उंच शिखरकळसूबाई सहा वेळाचढून झाले. हिमालातीलकांगरा हे ६१२०मीटर उंचीचे शिखरपण काबीज झाले. आता पुढची चढाईही ६७५० मीटरउंचीच्या मीरा याशिखरावर होणार आहे. २०१९मध्ये जगातील सर्वातउंच शिखर माऊंटएव्हरेस्ट काबीज करण्याचा भावेशचासंकल्प आहे. त्यावेळीबहुधा तो माऊंटएव्हरेस्ट चढून जाणाराजगातील पहिला दृष्टीहिन व्यक्तीअसेल.
सन २०१९ चीमाऊंट एव्हरेस्ट मोहिमव २०२० मधीलटोकिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठीसुवर्णपदक या ध्येयासाठीभावेश स्वत:लातयार करतो आहे. त्यासाठी त्याचा दररोजमैदानावर कठोर परिश्रमव सराव सुरुअसतो. रोज ८–१० किमीधावणे, ५०० पुशअप्सव शारिरिक तंदुरुस्तीसाठीचीअन्य साधना त्याचीअव्याहतपणे सुरु आहे. पोलो मैदानावर धावण्याच्यासरावासाठी त्याची पत्नी नीता गाडीड्राईव्ह करते, गाडीला मागेएक १५ मुटाचादोर बांधलेला असतो, तो हातात धरुनभावेशने गाडीच्या मागे धावायचेअशी त्याची दररोजचीसर्कस सुरु असते. भावेश गमतीने सांगतोकी मला माझ्यापत्नीशी खूप सांभाळूनवागावे लागते. कारण एखादंदिवशी काही कमीअधिकझाले तर सकाळीधावतांना ती गाडीचावेग वाढवून देणचाधोका असतो !
एकदा रिलायन्सतर्फे भावेशचा सत्कार केलागेला व त्यालामदत म्हणून ५१लाखांचा चेक दिलागेला. भावेशने तो नम्रपणे परत केलाव त्याऐवजी रिलायन्सनेत्याला काम द्यावेअशी विनंती केली. अशाप्रकारे दिलेला चेक नाकारणारीव्यक्ती कदाचित रिलान्सला पणक्वचितच भेटली असावी. बर्याच बैठकांनंतरभावेशच्या कंपनीला रिलायन्सकडून काम मिळाले व नंतर त्यांच्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारावर दरवर्षीच मिळत गेले. त्या नाकारलेल्या ५१लाखांच्या चेकच्या बदल्यात गेल्याकाही वर्षात त्यानेरिलायन्सकडून कैक कोटीरुपयांच्या आर्डर्स मिळवून पूर्णकेल्यात; यामध्ये भावेशची दूरदृष्टीव भक्कम व्यावसायिकदृष्टीकोन लक्षात येतो.
मेणबत्या तयार करतांनाजे मेण वायाजायचे त्याचे कायकरावे हा मोठाप्रश्न त्यांच्यापुढे होता. कारण अशाप्रकारच्या वेस्टेज मेणाने गोदामेभरलेली होती. बऱ्याचविचारांती त्यांनी यापासूनपुन्हा नविन मेणबत्यातयार करायला घेतल्यात. पण त्यामध्ये विविधप्रकारचे रंग वप्रकार असल्याने व तेसगळे एकत्र मिसळल्यागेल्याने त्यापासून बनविलेल्या मेणबत्यादिसायला चांगल्या नव्हत्या. पुन्हाविचार–चिंतन सुरुझाले. शेवटी त्यामध्येकाळा रंग मिसळूनसंपूर्ण काळ्या रंगाच्या मेणबत्त्यातयार करण्यात आल्यातव त्या विक्रीसाठीदुकानांमध्ये पाठविल्यात. बरेच दिवसझालेत तरी त्यातशाच पडून होत्या. काळ्या रंगामुळे त्यांना ग्राहकच मिळेना. पुन्हा भावेशची चौकटीबाहेरविचार करण्याची सवयकामी आली. त्यानेअसा प्रचार करणेसुरू केले कीया काळ्या रंगाच्यामेणबत्त्या वातावरणातील सर्व नकारात्मकगोष्टींना दूर ठेवतात! आणि झाले ! ज्यामेणबत्त्यांना एकही ग्राहक घेत नव्हता, त्यामेणबत्त्यांना इतकी मागणीआली की पुढलेकाही महिने त्यांनाबाकी सर्व कामेबंद ठेवून, केवळवेस्टेजमधूनच नाही, तर नविनमेणापासून फक्त काळ्यारंगाच्याच मेणबत्त्या बनवाव्या लागल्यात.
भावेशच्या वाटचालीत त्याची पत्नीनीता हिचा पणबरोबरीचा वाटा आहे. तिने भावेशकडे तोदृष्टीहिन आहे अशानजरेने कधीच बघितलेले/वागवलेले नाही. त्यामुळेपण स्वत:च्यादृष्टीहिनतेच्या मर्यादांवर मात करण्यासाठीव एक नॉर्मलव्यक्ती म्हणून जगण्यासाठी भावेशलामोलाची मदत झाली. नीताचा खंबीर पाठिंबा वआयुष्यातील प्रत्येक वळणावर असलेलीभक्कम सोबत यांच्याचआधारे, एरव्ही डोळस व्यक्तीपण धजावणार नाही, अशा प्रकारची नवनवीनआव्हाने तो स्विकारूव यशस्वी करूशकला.
महाबळेश्वरयेथील त्यांच्या कंपनीमधेतुम्ही त्यांचं काम पाहूशकता. तसेच त्यांनीआता महाबळेश्वर येथेवैक्स म्युझियम पणतयार केलेले आहेव अनेक थोरव्यक्तींचे मेणाचे पुतळे यासंग्रहालयात तयार केलेलेआहेत.
एवढे सगळे यश मिळवूनसुद्धा भावेश व नीता दोघेही अत्यंत नम्र, गोड व प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेले आहेत. त्यांना मिळालेल्या सर्वच गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये कृतज्ञताभाव, जो हल्ली दुर्मिळ झालेला आहे, अगदी ठासून भरलेला आहे व कदाचित एवढ्या उत्तुंग यशामागे ते एक महत्वाचे कारण असावे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह..
उपाशी न राहता वजन कमी करा.
काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या
१. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर जेवण संपवून ताटावरुन उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे ताटावर बसा. म्हणजेच हळूहळू जेवा. जास्त वेळा चावून खा. ३२ वेळा चावण्याचा नियम पाळा. त्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाले तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधानी पावते व कमी जेवूनही पोट भरल्याचे समाधान होते. जेवण आपोआपच कमी होते व वजन कमी व्हायला मदत होते.
२. चव समजणार्या ग्रंथी जीभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जीभेच्या या भागावर जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जीभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जीभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसण खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय ! त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वांसह अन्नाचा आस्वाद घेणे महत्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन जेवण केल्यास सुध्दा खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.
३. आपले पोट-जठर हे volume Sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरल्या जाणे महत्वाचे. कारण ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणार्या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाद, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे.
४. जेवण करतांना रोज हॉटेलमध्ये बसून जेवण घेतो आहोत असे समजून जेवायचे. म्हणून हॉटेलसारखे प्रथम फक्त वाटीभर सूप वा ताक प्यायचे. नंतर सलादची डीश संपवायची. एखादी वाटी अंकुरित कडधान्य खावून घ्यायचे. त्यानंतरच मुख्य जेवण – वरण, भात, भाजी, पोळी वाढून घ्यायचे व पोट भरुन जेवायचे. म्हणजे मग उपाशी न राहताही वजन कमी करता येईल. मग जेवतांना किती खावू असा विचार करण्याची फारशी गरज राहणार नाही.
५. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षा ही जास्त वाढते. जेवण कमी न करता सुध्दा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजी पण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. तेल-तूप व साखर गूळ व हे ज्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ मुख्यत्वे मोजून खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारशे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत.
६. एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.
७. वजन कमी करतांना फार घाई करु नये. साधारणत: दर आठवड्याला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे.
८. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वांसाठीच हितकर असल्याने, घरातील सर्वांनीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील.
९. वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्य त्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करुन स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही.
१०. शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताण ही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्वाचे असते.
आहार शास्त्राचे काही मूलभूत नियम पाळणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.
अ. रोजची दोन जेवणे व नाश्ता इत्यादींमध्ये खालीलपैकी प्रत्येक गटातील एक पदार्थ असणे गरजेचे आहे.
१. धान्य- गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बारी
२. द्विदल धान्ये – डाळी वा उसळी- तूर, चना, मूग, मटकी, बरबटी, उडीद
३. पालेभाज्या व ङ्गळभाज्या व ङ्गळे
४. उर्जा देणारे पदार्थ- स्निग्ध पदार्थ – तेल, तूप, लोणी, व साखर, गूळ
५. प्राणीज पदार्थ = दूध, दही, ताक वा मांसाहारी पदार्थ – अंडी, मासे, मटन
ब. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी उपयुक्त राहील. कच्चा भाजीपाला सलादच्या स्वरुपात भरपूर खाल्ला पाहिजे. भाज्या कमीत कमी शिजवायला पाहिजेत. गाजर मूळा, काकडी, पत्तागोबी, मेथी, कांदा इत्यादि पदार्थ किसून त्यात चवीसाठी जीरा पूड, साखर, मीठ, दही घेतल्यास उत्तम,
क. जेवणामध्ये जास्त उर्जेचा साठा असणारे पदार्थ हे कमीच असावेत.
ड. आपली स्निग्ध पदार्थाची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणारे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. मसालेदार तर्रीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बरेचदा वरुन घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्ध पदार्थांचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रुपांतर होते व वजन वाढते.
हे झाले दिसणार्या स्वरुपातील स्निग्ध पदार्थांबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्ध पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई इ. हे पण रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचा हिशोब करतांना मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात.
यावर खात्रीलायकरित्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीत जास्त माणशी ६०० मिली असा हिशोब करुनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढ्यातच सर्व भागवावे.
साखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्राम साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील.
ताजे व स्वच्छ अन्न : दिर्घायू व निरोगी जगण्यासाठी अन्नपदार्थांबाबत ही दोन तत्वे महत्वाची. ताजे म्हणजे निसर्गामध्ये तयार झालेल्या मूळ अवस्थेत अन्न पदार्थ वापरणे. निसर्गात तयार झालेल्या वस्तू फार काळ टिकत नाही. त्या टिकाव्यात म्हणून त्यावर नाना प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. उदा. कैर्या वर्षभर खाता याव्यात म्हणून लोणचे बनवून टिकवावे लागते. तेल जास्त दिवस चांगले रहावे यासाठी रिफाईनिंग सारख्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. तांदूळ जास्त दिवस टिकावेत म्हणून पॉलिशिंग करावे लागते. कारण पॉलिश केलेल्या तांदूळाला किड लवकर लागत नाही. पण त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य कमी होते.
स्वच्छ म्हणजे केवळ दिसण्याच्या बाबत नाही; तर रसायनमुक्त अन्न, निसर्गात तयार झालेल्या मूळ स्वरुपातील ताजे अन्न म्हणजे स्वच्छ. कोणतेही रसायन अन्नपदार्थ तयार करण्यासाठी न वापरणे म्हणजे स्वच्छ अन्न. आज शेतीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात खते व किटकनाशकांचा वापर केला जातो की जवळपास सर्वच अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात त्यांचे अंश शिल्लक राहतात व ते आपल्या शरीरात सुध्दा जातात. ती शरीरात गेल्यावर त्यांचे नेमके काय होते, ते शरीरात किती दिवस साठविले जातात, त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात याबाबत अद्याप पावेतो तरी विज्ञानाला फारशे कळलेले नाही. पण यातील बहुतेक सर्व रसायने ही अत्यंत जहाल विषारी पदार्थ असून, त्यांचा थोडाही अंश मानवी आरोग्यासाठी घातक ठरु शकतो असे मानण्यास बराच आधार आहे. त्यामुळे रसायने न वापरता तयार झालेला भाजीपाला, फळे व इतर अन्नपदार्थ मिळविणे आरोग्यासाठी महत्वाचे. त्यासाठी मग जास्त पैसे मोजावे लागले तरी ते अंतिमत: फायद्याचेच ठरेल.
त्याचप्रमाणे अन्नपदार्थ जास्त टिकले पाहिजेत यासाठी (शेलफ लाईफ वाढविण्यासाठी) त्यांच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यात येतात. यातील बर्याचशा प्रक्रिया या रासायनिक पदार्थांचा वापर करुन केल्या जातात. या रसायनांचे अंश मानवी शरीरात जातात. हे सर्व अस्वच्छ अन्न होय. ते कमीत कमी खायला हवे.
महात्मा गांधींनी एका वाक्यात आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत नाही, सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. काय खावे व काय खावू नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार !
बिनातेलाची फोडणी : आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या बनवितांना फोडणी देणे हा प्रकार असतोच. कढईतील तेल तापले की त्यामध्ये आधी मोहरी व जीरे टाकायचे. ते तडतडते व फुटायला लागते. मग त्यात हिंग, हळद व इतर मसाल्याचे पदार्थ टाकायचेत. काही वेळा लसण, अद्रक व कांदा बारीक करुन टाकल्या जातो. हे सर्व मिश्रण तेलामध्ये भाजून झाले की त्यात भाजी वा जे काही बनवायचे तो पदार्थ टाकायचा; रस्सेदार भाजी बनवायची असेल तर पाणी घालायचे, सुकी भाजी बनवायची असेल तर तशीच कोरडी शिजवायची. अशा पध्दतीने भाज्या, आमटी वा अन्य पदार्थ बनविल्या जातात. काही वेळा फोडणी तयार झाली की ती कोशिंबिर, काही भाज्या, वरण यासारख्या पदार्थावर वरुन टाकायची अशी पण पध्दत आहे.
तेलातूपाचा एक थेंबही वापरायचा नाही, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही का असा प्रश्न बहुतेकांच्या मनात येतो. खरेतर पथ्य फक्त तेलातूपाचे आहे व तेवढेच फक्त वापरायचे नाही आहे. त्यामुळे तेलातूपाचे पथ्य सांगितले की बहुतेकांना ते अशक्यच वाटते. कारण तेलतूप खायचे नाही म्हणजे मग फक्त उकडलेलेच खायचे असा बहुतेकांचा समज होतो. असे उकडलेले बेचव अन्न आयुष्यभर कोण व कसे खाणार हा यक्षप्रश्न पडतो. तेलतूप न वापरता फोडणी देता येते व तेलाशिवाय एरव्ही फोडणीत वापरल्या जाणारे इतर सर्व पदार्थ वापरता येतात हे लगेच ध्यानात येत नाही. चव ही फक्त तेलातूपावर अवलंबून नसते तर ती फोडणीसाठी वापरल्या जाणार्या या सर्व पदार्थांमुळे असते हा फरक चटकन ध्यानात येत नाही.
तेला तूपाचा एक थेंब ही न वापरता भाज्या बनविता येतात ही बाब बहुतेकांना आश्चर्यकारक वाटते. खरेतर त्यात काहीही कठीण नसते. कधी पाहिले-ऐकलेले नसते म्हणून तसा समज आहे. यासाठी नेहमी फोडणी देतो तशीच सर्व तयारी करायची. कढई गरम करायची. मोहरी व जीरे भाजून ठेवायचे. कढई गरम झाली की हे भाजलेले मोहरी-जिरे कढईत टाकायचे. ते तडतडत फुटते. नंतर इतर गोष्टी कढईत टाकायच्यात. जसे लसण व कांदा. मंद आचेवर परतत राहत ते भाजायचे. खाली लागू नये यासाठी फारतर थोडे पाण्याचे सिपकारे मारत रहायचे. नंतर इतर गोष्टी नेहमीच्याच पध्दतीने करायच्यात. रस्सेदार भाजी असेल तर पाणी टाकल्या जातेच व खाली लागण्याचा प्रश्न येतच नाही. सुकी भाजी बनवायची असेल तर, कांदा वापरलेला असल्यास त्याचा चिकटपणा व ओलसरपणा यामुळे खाली भाजी लागत नाही.
अशाप्रकारे जवळपास सर्वच भाज्या बिना तेलाच्या बनविता येवू शकतात. चवीमध्ये ही काही सुध्दा फारसा फरक न पडता. दिसण्यामध्ये जरुर थोडा फरक जाणवू शकेल. चवीचा व तेलाचा संबंध आपल्या डोक्यात पक्का बसलेला असल्याने फक्त असे वाटेल. हा संबंध पूर्णपणे काढून टाकावा लागेल.
श्री. सचिन बुरघाटे, अकोला
जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या सचिनला सातपैकी चार विषयात ३५ तर दोन विषयात ३६ मार्क्स मिळाले होते. हा आरंभबिंदू असणारा ५२३ लोकसंख्येच्या अकोला जिल्ह्यातल्या एका खेड्यातील हा मुलगा वयाच्या २५-३० मध्येच हजारो व्यावसायिकांना इंग्रजी व व्यक्तिमत्तव विकासाचे धडे देणारा, तरुण यशस्वी उद्योजक व प्रभावशाली वक्ता/प्रशिक्षक बनतो अशी गगनभरारी घेणाऱ्या सचिनची हि संघर्षमय व प्रेरणादायी जीवनकहाणी.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ५२३ वस्तीचे लाडेगाव हे सचिनचे गाव. आईवडील जेमतेम दुसरा वर्ग शिकलेले. इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेले सरकारी झोपडीवजा घर. इतरांच्या शेतात कामाला जाऊन रोजीरोटी कमविणे; जोड म्हणून सचिनच्या वडिलांनी एक छोटेसे घरगुती किराणा दुकान पण सुरु केलेले. सचिन गावच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात अगदीच सर्वसाधारण व इतरही कुठल्याच बाबतीत काही विशेष सांगावे अशी ओळख नसलेला सचिन कसाबसा ३५ टक्के मार्क मिळवून सातवी पास झाला. तो आठवीत असताना घडलेल्या एका छोट्याशा घटनेने त्याच्या आयुष्यात बदलाला सुरुवात झाली असे तो सांगतो. त्याच्या गणिताच्या शिक्षकांनी त्याला पुढे बोलावून एक गणित सोडवून दाखविले व आता तू हे इतर मुलांना समजावून सांग असे सांगितले. बस, एवढेसे प्रोत्साहन सचिनसाठी ठिणगी ठरले. त्याला वाटले कि ज्याअर्थी शिक्षकांनी मला हे करायला सांगितले याचा अर्थ मला गणित येते व आपण काही स्वतःला समजतो तसे अगदीच टाकाऊ नाही आहोत. त्या दिवसापासून आपल्यामध्ये काहीतरी वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले. तो नेटाने अभ्यास करायला लागला व दहावीला चक्क ५५ टक्के मार्क्स घेऊन पास झाला. एवढे मार्क्स मिळविणे म्हणजे त्याच्या दृष्टीने बरीच मोठी प्रगती होती.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अभ्यासात हुशार असलेल्या लहान भावाने शिक्षण घ्यावे व सचिनने घरचे किराणा दुकान सांभाळावे असे वडिलांनी सुचविले. किराणा सामान आणण्यासाठी एवीतेवी १०-१२ किमी अंतरावरच्या तालुक्याच्या गावी सायकलने जावे लागायचे. मग तेथे असलेल्या महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घ्यावा असा त्याने विचार केला. सकाळी ११ पर्यंत दुकान चालवायचे, त्यानंतर अकोटला येऊन कॉलेज करायचे व परत जाताना दुकानासाठी लागणारे किराणा सामान घेऊन जायचे व संध्याकाळी पुन्हा दुकान चालवायचे, अशी व्यवस्था होऊन सचिनचे शिक्षण सुरु राहिले. त्याचे गणित जरा बरे असल्याने व दुकान चालवीत असल्याने अकाउंट्स या विषयात त्याला आवड निर्माण झाली. अकरावीला सत्र परीक्षेत एका विषयात त्याचा वर्गातून पहिला नंबर येऊन १० रुपयांचे पेन त्याला बक्षीस मिळाले. सचिन सांगतो, “ऊस दिन जैसेही सरने ये घोषित किया कि मेरा पहला नंबर आया है और बक्षीस लेने हेतू मुझे सामने बुलाया तब जिंदगीमें पहली बार अपने आपसे मुलाकात हो गई. ज्यादातर हमें तो अपने आपसे मिलनेका समय हि नही मिलता, इसीलिये हमे खुदकी हि असली पहचान नही होती है”. या नवीन ओळखीमुळे सचिनची अभ्यासाची गोडी वाढली. बारावीत त्याला खूपच चांगले मार्क्स मिळालेत. त्यावेळच्या रूढीप्रमाणे त्याने डीएड करावे असा आग्रह वडिलांनी धरला व त्याला नागपूरला प्रवेश दिला. मात्र सचिनचे मन त्यात रमले नाही व दोन महिन्यातच तो हट्टाने डीएड सोडून घरी परत आला. त्यामुळे रागावलेल्या वडिलांनी त्याच्याशी बोलणेच बंद केले. वडिलांचे आपल्याबद्दल झालेले हे नकारात्मक मत कधीतरी बदलावे यासाठी जिद्दीने तो पेटून निघाला व आमूलाग्र बदलला. मात्र वडिलांचे मत बदलण्यासाठी त्याला सहा वर्षे वाट बघावी लागली.
सचिनने अकोटलाच बीकॉमला प्रवेश घेतला. येथेच त्याने आयुष्यातील पहिले भाषण दिले. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला व सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तो इंग्रजीमध्ये करायला लागला. लवकरच वक्ता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पुढच्या शिक्षणासाठी थोडे पैसे मिळावेत यासाठी त्याने याच काळात एसपीएस कोचिंग क्लास सुरु केला. त्याच्या शिकविण्याचा अनेकांना फायदा होत गेला व जर सचिनने शिकविले तर कोणी नापास होणार नाही अशी त्याची ख्याती झाली. बीकॉम पूर्ण झाल्यावर पुण्याला एमबीए करायला जाण्याचे ठरविले. पैशांची बोंब होतीच. मित्र-परिचितांकडून पैसे जमा करून जाण्याची सोय झाली. दीड वर्षे केवळ एकवेळचे खाऊन शिक्षण पूर्ण केले. आळंदी रोडवरच्या गजानन महाराज मंदिरात आरतीनंतर प्रसाद म्हणून खिचडी मिळायची, म्हणून तो व त्याचा मित्र दर गुरुवारी प्रसादाच्या रांगेत उभे राहून मिळालेल्या प्रसादामध्ये पोटाची भूक भागवू लागले. मात्र पुढे नोकरी मिळाली व पहिला पगार मिळाला तेंव्हा पण ते रांगेमध्ये उभे होते, फक्त त्यादिवशी आजचे अन्नदाते म्हणून सचीन व त्याच्या मित्राचे नाव समोर बोर्डावर लिहिलेले होते. आपल्याला मिळालेले काही अंशी समाजाला परत करण्याची वृत्ती तेंव्हापासूनच त्याच्यामध्ये जोपासल्या गेली.
दोन वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर मात्र आपल्या भागातील लोकांना आपली जास्त गरज आहे व शिकविणे हि आपली प्याशन आहे हे लक्षात आल्याने २००९ साली नोकरी सोडून अकोला येथे परत येण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. इंग्रजी भाषेची भीती घालविण्यासाठी व केवळ इंग्रजी येत नसल्याने आत्मविश्वास कमी राहतो व इतर सर्वकाही असूनही आपण मागे पडतो या स्वतःच्या वाटचालीतील अनुभवामुळे त्याने अकोल्याला इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी ‘अस्पायर‘ नावाची संस्था सुरु केली. भाषा शिक्षणाची सहज पचनी न पडणारी हि त्यावेळची सर्वस्वी नवीन संकल्पना, २००९ मध्ये केवळ १३ प्रशिक्षणार्थीना घेऊन सुरु झालेला प्रवास, आज रोजचे १५००-२००० विद्यार्थी येथपर्यंत येऊन पोहचला आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये ‘अस्पायर‘ द्वारा ४०००० डॉक्टर्स, वकील, सीए, गृहिणी, ज्येठ नागरिक व विद्यार्थी अश्या सर्वानाच इंग्रजी भाषा व सॉफ्ट स्किलसचे प्रशिक्षण दिले गेले आहे. केवळ जिद्द, आत्मविश्वास व अफाट मेहनतीच्या जोरावर हे शक्य झाले आहे. आज सचिन हजारोंचा आयकॉन बनलेला आहे. त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तीनही पिढ्याचे प्रतिनिधी असतात. यातून अनेकांची आयुष्य बदलू शकलीत. सामान्य लोकांनाही शक्य व्हावे यासाठी अतिशय माफक शुल्क आकारून ‘अस्पायर‘ अनेकांचे आयुष्य बदलन्याचे काम करीत आहे.
देश विदेशातील तीन लाखपेक्षाही जास्त श्रोत्यांसमोर व तेही मुख्यत्वे इंग्रजी/हिंदी भाषेमध्ये विविध विषयावर मुख्य वक्ता म्हणून सचिन बोललेला. स्वतःच्याच गावात तिकीट लावून नियमितपणे हजारो लोक त्याचे भाषण ऐकायला येतात, कदाचित कुठल्याच वक्त्याला न जमलेला हा चमत्कार त्याने करून दाखविलेला आहे.
तिशीमध्येच एवढे मोठे यश मिळवूनही, सचिन आताही अतिशय विनम्र व सौजन्यशील आहे. उलट सामाजिक बांधिलकीसुद्धा जपत, गावांमधील शेकडो गरीब मुलामुलींना विविध प्रकारे स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तो सातत्याने मदत-मार्गदर्शन करीत असतो.
समजत नसणाऱ्या वयात कधीतरी त्याला विचारल्या गेलेल्या तू कशासाठी जन्म घेतलाय या प्रश्नाचे त्याने त्यावेळी दिलेले उत्तर पुढील आयुष्यात खरे करून दाखविले. ते उत्तर होते “ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है, ऊस अधूरेपन को दूर करने के लिये हम पैदा हुए है”
संपर्क :
Aspire- The Institute of Human Development Sahakar Nagar, Gaurakshan Road, Akola
Office: 8275726017/16
Email: sachinburghate@gmail.com
URL: www.aspire.ihd.com
स्वयंसेवी संस्थाना नेहमीच जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत काय उपाय करावेत, निधीसंकलन/देणग्या कशा मिळवाव्यात, यासंदर्भात उपयुक्त माहिती.* (डॉ. अविनाश सावजी, प्रयास, अमरावती यांचे पुणे येथील राज्य स्तरीय संस्था व्यवस्थापन कार्यशाळेमधील सत्र)
Dr. Avinash Saoji, Director PRAYAS, Amravati : Speech given in a 2 days NGOs Capacity Building Workshop at MIT Pune. He had given tips regarding the crucial issue of Fund Raising for NGOs & also about social entrepreneurship.
Dr. Avinash Saoji, Director PRAYAS, Amravati : Speech given in a 2 days NGOs Capacity Building Workshop at MIT Pune. He had given tips regarding the crucial issue of Fund Raising for NGOs & also about social entrepreneurship.

