Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Bal-Bhavan

प्रयास बालभवन
वर्षभर निरंतर चालणारा उपक्रम
स्थळ: प्रयास सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती.
प्रवेश : वय वर्षे ५ ते १४ मुले व मुली दोघांसाठी.
दर शनिवारी दुपारी ४ ते ६ व 
दर रविवारी सकाळी ९ ते ११
(उपक्रमाची सुरुवात २३ नोव्हेंबर २०२४ पासून झालेली असून, आतापर्यंत 35 मुलांनी प्रवेश घेतलेला आहे.
प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत. त्यापूर्वी तुमचा प्रवेश नक्की करा.)
———-
उद्देश : सहभागी होणाऱ्या मुलांमध्ये खालील बदल व्हावेत.
✓ स्क्रीन पासून आंशिक मुक्तता व्हावी.
✓ आरोग्यदायी खाण्यापिण्याच्या सवयी लागाव्यात.
✓ शिकण्याचा निखळ आनंद घेता यावा.
✓ पुस्तकांशी मैत्री होऊन वाचनाची गोडी निर्माण व्हावी.
✓ जिज्ञासा जागृत होऊन, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा.
✓ विवेकी विचार व कृती करायला शिकणे.
✓ थोडी काटक आणि रफ अँड टफ व्हावीत.
✓ धीटपणा व आत्मविश्वास वाढावा, बुजरेपणा कमी व्हावा.
✓ मातृभाषेचा नीटपणे वापर करता यावा.
✓ शरीर व मन मजबूत व्हावे, ✓संवेदनशीलता वाढावी.
✓ पैशांचे महत्त्व कळावे.
✓ घरी व बाहेर बोलण्या वागण्याचे सामाजिक कौशल्ये विकसित व्हावे.
✓ इतरांचा आदर करायला व मैत्रीपूर्ण नाते जोडायला शिकावेत.
✓ कलागुणांना वाव मिळावा.
✓ स्वभावातील दोष कमी व्हावेत व गुण वाढावेत.
✓ एकूणच ते एक चांगला माणूस बनावेत.
—————
बालभवनचे उपक्रम
✓ बैठे व मैदानी खेळ
✓ गाणी, गप्पा व गोष्टी
✓ वाचन, लेखन व पुस्तकमैत्री
✓ हस्तकला, क्राफ्ट
✓ संगीत, गायन, नृत्य, अभिनय, वक्तृत्व. (वैयक्तिक रूचीनुसार)
✓ भाषा, गणित व भूगोलाचे खेळ.
✓ विज्ञानाचे प्रयोग
✓ स्थानिक छोट्या सहली व भेटी.
✓ विविध क्षेत्रातील आदर्शाची ओळख.
✓ व्यायाम, योग, सूर्यनमस्कार
✓ घरी स्वतः करावयाच्या असाईनमेंट्स.
————–
पालकांसाठी दरमहा एक मार्गदर्शनपर सत्र.
वाचनालय.
वैयक्तिक मार्गदर्शन व कौंसेलिंग.
—————
प्रवेश घेण्यासाठी : ऑनलाईन फॉर्म भरणे.
———–
तुमच्या मुलांच्या स्वस्थ, आनंदी व अर्थपूर्ण जीवनासाठी, 
तसेच तुम्ही स्वतः एक जागरूक पालक होण्यासाठी आजच पाऊल उचला !!
तुमच्या संपर्कातील इतरही जिज्ञासू पालकाना पाठवा. 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

प्रयास बालभवन

Add address