Author: admin
असाही डॉक्टर…… डॉ अनिल पटेल, यवतमाळ
आतापर्यंत त्यांच्याकडे येऊन गेलेल्या ५ लक्ष रुग्णाचे हाताने लिहिलेले रेकॉर्ड उपलब्ध आहे. कितीही वर्षे आधी रुग्ण आलेला असला तरी नाव-गाव सांगितले कि ते रेकॉर्ड ५ मिनिटातच सापडते व त्यामध्येच नवीन तपशील लिहिला जातो.
त्यांचा सल्ला हा केवळ कान नाक घश्याच्या तक्रारीपुरता मर्यादित नसतो तर, रुग्णाच्या आहार-व्यायाम-व्यसनादि सवयीपर्यंत व प्रसंगी कौटुंबिक प्रश्नांपर्यंत असतो. त्यामुळे त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आलेत. अनेक रुग्णांचे तर ते फॅमिली डॉक्टर व सल्लागारच झालेलेआहेत
अनुभवांती त्यांनी औषधे व ऑपरेशन्सचे प्रमाण कमी करत आणले व बरेचसे आजार हे साध्या बिनपैशाच्या उपायांनी बरे होतात म्हणून चुकीच्या सवयी बदलून व्यायाम-आहारादी आरोग्यदायी सवयी, योग्य सल्ला व मार्गदर्शन यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे खूपसे रुग्ण, त्यांच्या सल्ला घेण्यासाठी आवर्जून येतात.
खरेतर त्यांचा यवतमाळशी कसलाही संबंध नव्हता. त्यांचे सर्व बालपण-शिक्षण-पश्चिम महाराष्ट्रात झालेले. इकडे ना त्यांचे कोणी नातेवाईक, ना काहीही संपर्क. सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यावर पुढील शिक्षण व अनुभव मुंबई-पुणे येथे घेतल्यावर त्यांनी विदेशात जाऊन भरपूर पैसा व अन्य सर्व भौतिक सुखसोयी मिळण्याच्या सर्व संधी असताना आपल्या गुरूंच्या “जेथे गरज आहे तेथे जावे” या सल्ल्यानुसार शोध घेत असता यवतमाळला येऊन पोहचले व १९८० मध्ये स्वतःचा खाजगी दवाखाना सुरु केला. त्यावेळी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकही इएनटीतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना वर्धा किंवा नागपूरला जावे लागत असे. त्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय होई. त्यामुळे अनेकजण उपचार घेत नसत. गरीब व गरजू रुग्णांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी त्यांनी सरकारी रूग्णालयात मानसेवी काम मागून घेतले, गेली ३७ वर्षे बरेचदा मोफत वा अतिशय कमी फी घेऊन हजारो रूग्णांना त्यांनी बरे केले.
त्याकाळात त्यांनी परिसरातील खेड्यापाड्यामध्ये रुग्णतपासणीसाठी जायला सुरुवात केलेली, जी आज तागायत ३७ वर्षांनंतरही सुरूच आहे. प्रारंभीच्या काळात एसटीने, नंतर स्कुटरने १५० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात ते जात असत. पुढे चारचाकी वाहन आल्यावर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायला लागलेत. आतातर निमंत्रण नुसार त्यांची शिबिरे इतर ९ राज्यांमध्ये पण झालेली आहेत. गेली अनेक वर्षे तर आठवड्यातील सातहि दिवस त्यांची शिबिरे ठरलेल्या वेळापत्रका नुसार सुरु असतात. पुढील ३ महिन्याचे वेळापत्रक त्यांच्या ओपीडीमध्ये लागलेले असते. त्यामध्ये कसल्याही कारणासाठी बदल होत नाही. याबाबतचा क्रम हा साप्ताहिक, १५ दिवसांनी वा एक महिन्यांनी असा गरजेनुसार त्या-त्या गावात ठरलेला असतो. आतापर्यंत शिबिरासाठीचा त्याचा प्रवासच हा १०-१२ लक्ष किमीपेक्षाही जास्त झालेला असावा.
वेळेच्या संदर्भात ते अतिशय काटेकोर आहेत. दवाखाना, घर, सामाजिक जबाबदाऱ्या, छंद या सर्वांचे अतिशय सुंदर नियोजन ते करत आलेले. त्यामुळे मुलगा लहान असताना ते त्याला दहाव्या वर्गापर्यंत ट्युशन न लावता स्वतः शिकविण्यासाठी वेळ काढू शकलेत. कुटुंबियांसोबत वर्षातून एकदोनदा सहल-सुटीचा आनंद, बाबा आमटे, ठाकूरदासजी बंग या ज्येष्ठांपासून तो डॉ. रवी कोल्हे, वसंत करुणा फुटाणे व इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक स्नेह-संबंध, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाणे-येणे, त्यांच्या विषयातील होणाऱ्या कॉन्फरन्सेस या सर्वच भूमिकांना ते न्याय देऊ शकलेत. एवढेच नव्हे तर अतिशय नियमितपणे वाचन, व्यायाम, गाणी ऐकणे इ. अनेक वैयक्तिक बाबींचा पण अतिशय काटेकोरपणे वेळ काढत आलेत. जीवनाच्या जवळ जवळ सर्वच भूमिका वेळेचे इतके सुंदर नियोजन करून संतुलित अवस्थेत जगण्याचा मनापासून आस्वाद व आनंदघेणाऱ्या डॉ. अनिल पटेलांसारख्या व्यक्ती अभावानेच दिसतात.
त्यांच्या आयुष्यावर अनेकांचा प्रभाव राहिलेला आहे. व्यक्ती लहान असो, मोठी असो, जे आवडले-पटले ते त्यांनी आपल्या जगण्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचा सिनेमा त्यांनी पाहिला, पुस्तके वाचलीत व त्यांच्या आयुष्यात साधेपणा व इतर मूल्ये दृढ झालीत बाबा आमटे, डॉ रवी कोल्हे व इतर अनेकांकडून असेच काहीतरी ते घेत गेलेत. राजीव दीक्षित, ओशो यांचा पण बराच प्रभाव त्यांच्यावर झालेला. मात्र एवढे असूनसुद्धा कुठल्याच टोकाला न जाता व कोणत्याच चौकटीत स्वतःला बांधून न घेण्याचे पथ्य मात्र त्यांनी सांभाळले.
त्यांनी झोप कमी करण्याचा प्रयोग केला. ती कमीकमी करत त्यांनी आता ४ तासांवर आणलेली आहे. रोज रात्री ते ११ वाजता झोपतात व सकाळी साडेतीनला उठतात. दिवसभर कुठल्याही विश्रांती शिवाय ते कार्यरत असतात.
एक पालक म्हणून हि त्यांच्यापासून बरेच शिकण्यासारखे आहे. एकुलता एक मुलगा गौरवसाठी ते आवर्जून वेळ काढायचेत, त्यामुळे ते त्याचामित्र बनू शकलेत. त्याला आग्रहपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकविले, फाज़िल लाड केले नाहीत. १८ वर्षपर्यंत त्याला स्कुटर चालवू दिली नाही. सगळीकडे त्याला सोबत घेऊन त्याला गरिबी व इतर गोष्टी दाखविल्या. त्यामुळे कदाचित तो आज त्यांचा सामाजिकतेचा वारसा चालवितो आहे.१९८३ साली नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवी घेतांनाच, आयुष्यात काय करायचे नाही हा निर्णय माझा झालेला होता. नोकरी करायची नाही, स्वत:चा दवाखाना थाटायचा नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता समाजातील गरजू लोकांसाठी करायचा. खूप जास्त शिकून काही ठराविक लोकांसाठी काम करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी काही करता आले तर करायचे, हे नक्की झाल्याने अनेक विषयांमध्ये एमडी/एमएस ला सहज प्रवेश मिळत असतांना पण पुढे शिकायचे नाही हे ठरविले.
कॅन्सरशी मैत्री करू या !
एकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.
One way of doing it by contributing to various PRAYAS-Sevankur activities. The recurring expenses of Prayas-Sevankur are around 15 Lakhs Rs. this year. In addition to this we need to start & complete our own building “Prayas-Sevankur Bhavan” of 9500 sq. feet at Farshi Stop, Amravati. It will cost around 100 Lakhs Rs. It will be the homely training centre (actually a recharging station) for the children, youths and all others.
I expect from you a monthly or yearly voluntary donation for PRAYAS-Sevankur, as my birthday gift along with your well wishes. It will help me in concentrating on the real content of my work & not on thinking & collecting the funds, to run the activities.
The monthly / yearly contribution could be any amount you think you could give. You can give it by giving standing instructions to your bank to transfer the amount to the bank account of PRAYAS (details given below) every month or year on a specific day of the month or the year. Another way could be you can give it to our collection volunteers. (You yourself can become such a collection volunteer for minimum of 10 contributors.) You also can ask & motivate your other family members & friends to start GIVING this way.
In addition to the monthly / yearly contribution, one time donation for the “Building Fund” is also needed & expected.
Donations should be made by cash/ account payee Cheque or DD drawn in favor of
(You can directly deposit it in our following Bank accounts also)
1. “PRAYAS” Union Bank of India, Saving Bank Account no. 323302010064340 (Amravati Branch- IFSC – UBIN0532339)
2. “PRAYAS Chandur Bazar” State Bank of India, Saving Bank Account no.11590669883 (Chandur Bazar branch, Dist. Amravati. IFSC- SBIN0002147)
3. “PRAYAS Chandur Bazar” ICICI Bank, Saving Bank Account no.042801001011 Amravati branch, Dist. Amravati.
Donations to PRAYAS are entitled to 50% tax exemption u/s 80G of Income Tax Act.
PRAYAS is having FCRA Registration & can accept foreign donations also. (FCRA Reg. No. 083730013 / dated 02.09.1998)
Intro video of “Sevankur Little Champs” program by Dr Avinash Saoji at Jalgaon, which is highly inspirational & appreciated by thousands of spectators at Jalgaon, Nagpur, Wardha, Amravati & Yavatmal. Some selected challenged children share their life story & the struggle they faced for their outstanding achievements.
One of “Sevankur Little Champs” Suyash Khandekar being introduced by Dr Avinash Saoji.
One of the “Sevankur Little Champs” narrating his story of struggle & victory.
प्रिय मित्रांनो !
सर्व काही व्यवस्थित असून, हातपाय, कानडोळे धडधाकट असूनही, आम्ही आयुष्यात सारखं रडगाणं गात असतो. थोड्या थोड्या अपयशाने खचून जातो, नाही नाही ते नकारात्मक विचार मनात दाटून येतात, स्वत:चेच दु:ख असह्य व भारी वाटायला लागते. एकूणच जगण्यामधील आनंद व उत्साहाचा झरा आटून जातो. अशावेळी गरज असते ती सकारात्मक दृष्टीकोन जोपासून, मार्गात आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून काहीतरी मिळवून दाखविणार्या जित्याजागत्या आदर्शांची.
असेच काही आयडॉल्स् एकाच मंचावरुन लोकांच्या समोर ठेवणारा प्रयासचा ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा नविन उपक्रम. अतिशय आगळ्यावेगळ्या व प्रेरणादायी सिध्द झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कसं घडवावं, त्यासाठी काय करावं यासाठी चिंतेत असलेल्या पालकांना, आयुष्यात वेगळं काही करू पाहणार्या तरुणांना, थोड्या-थोड्या अपयशाने निराश होणार्या, खचून जाणार्या, भरकटलेल्या, जीवनाचा सूर हरवून बसलेल्या, प्रसंगी आत्महत्येचा विचार मनात येणार्या अशा सर्वांना, सकारात्मक दृष्टीकोन व जगण्याची प्रेरणा व एक नवी दिशा व आशा मिळाल्याचा अनुभव नुकत्याच जळगाव, नागपूर व वर्धा येथे झालेल्या ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या कार्यक्रमातून दिसून आले.
प्रयास या सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक व सेवांकुर या तरुणांसाठीच्या खुल्या मंचाचे प्रेरक असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व हजारोंना आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत-मार्गदर्शन करणारे डॉ. अविनाश सावजी यांच्या सातत्यपूर्ण कामामधून व चिंतनातून हा अतिशय प्रेरणादायी व उपस्थितांची हृदये हेलावून सोडणारा उपक्रम साकार झालाय. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ कार्यक्रमात ते स्वत: मंचावर या मुलांशी संवाद साधून त्यांना बोलतं करतात, त्यांच्या कणखर जगण्याची कहाणी सर्वांसमोर उलगडून दाखवितात. यासोबतच ते त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या वाटेने केलेच्या जीवनप्रवासातून, त्यांना स्वत:च्या स्वधर्माचा शोध कसा लागला, गेल्या २८ वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यास व सामाजिक कार्याच्या अनुभवांद्वारे अर्थपूर्ण जीवन का व कशासाठी जगायचे, यश कसे मिळवावे, सकारात्मक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व विकास इ. अनेक विषयांवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात. त्यांची करुणा व तळमळ, त्यांच्या शब्दाशब्दांमधून पाझरते व सर्व उपस्थितांच्या हृदयांना चिंब भिजवून, डोळ्यांमधील अश्रूंद्वारा ती मुक्तपणाने वहायला लागते. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते सर्व प्रेक्षक/श्रोत्यांना एका वेगळ्याच उंचीवर त्यांच्यासोबतच घेवून विहरतात.
Read in Loksatta
यशाची मूलभूत साधने
माणसाचं आयुष्य तो किती वर्ष जगला यावर नाही तर, किती अविस्मरणीय क्षण जगला यावरून मोजायचे असते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून तर आपण शिकतच असतो. खरी कसोटी तर आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून शिकण्यात असते. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे त्या नजरेने पहायला शिकणे ही खरी दृष्टी असेल. यालाच गुणग्राहकता असेही म्हणतात. ही सर्वांकडून शिकण्याची वृत्ती कायम राखणे आम्हाला समृध्द बनवित असते. ‘‘ज्या लोकांना कशासाठी जगायच हे माहिती असते, ते कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगू शकतात. ज्यांना हे माहिती नसते ते लोक आयुष्यभर कसं जगायचं याच चक्रात अडकलेले असतात.’’ मी कशासाठी जगतो आहे, माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, हे जर मला नाही कळले तर आयुष्य नुसतेच खाण्यापिण्यात व निरर्थक गोष्टी करण्यात वाया जाईल. आयुष्य हे एकदाच मिळते व ते अमूल्य आहे. मग ते केवळ पैशांसाठी एक्सेंज करणे हा मूर्खपणा असेल. त्याहून मोठे काहीतरी आयुष्यात करायचे आहे, ते काय असेल ते तुमच्यासाठी तुम्हालाच ठरवायचं आहे.
(यशस्वी व्हा या मी लिहिलेल्या पुस्तकामधून घेतलेला लेख)

