Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

मल्हार हेल्प फेअर’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

मल्हार हेल्प फेअर’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद – प्रत्येकाकडे देण्यासारखं काहीतरी असतं, ते दिले पाहिजे – डॉ. अविनाश सावजी जळगाव, दि. १९ – “या जगात प्रत्येकाकडे देण्यासारखं काहीतरी निश्चितच असतं, त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि कृतज्ञतापूर्वक ते दिलंही पाहिजे. तरच हा समाज सुदृढ अवस्थेत राहू शकेल.” असे प्रतिपादन *डॉ. अविनाश सावजी यांनी केले. ते ‘मल्हार हेल्प फेअर’च्या उद्घाटना प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सोहळ्याचे उद्घाटक ना. गिरीश महाजन हे होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आ. राजूमामा भोळे, महापौर ललित कोल्हे, रतनलालजी बाफना, करीम सालार, दलूभाऊ जैन, भरत अमळकर, प्रकाश चौबे, नंदू अडवाणी, आनंद मल्हारा आदी मान्यवर उपस्थित होते. लाईफ इज ब्युटीफुल व मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा आयोजित जळगाव शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या ‘मल्हार हेल्प फेअर’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शानीचा आज भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला. शहरातील सागर पार्क येथे *दि. १९ ते २१ जानेवारी २०१८* या कालावधीत दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होत असलेल्या या प्रदर्शनीत जिल्हाभरातील अनेक सेवाभावी संस्था व व्यक्तींची माहिती एकाच छताखाली खानदेशकरांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रदर्शानीला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. शहरात पहिल्यादांच ही आगळ्या-वेगळ्या प्रदर्शानी होत असल्यामुळे नेहमीप्रमाणे दिप्रज्ज्वलन न करता पाण्यामध्ये दिवे सोडून उद्घाटन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक मल्हार कम्युनिकेशनचे संचालक आनंद मल्हारा यांनी केले. त्यामध्ये त्यांनी या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शानीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. अविनाश सावजी यांनी आपल्या मार्गदशर्नात बोलतांना पुढे सांगितले, की एखाद्याची मदत करण्यासाठी पैसा देणं हा खूप सोपा मार्ग आहे तर वेळ देणं ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र एखाद्याला आपण वेळ देऊन मदत करू शकलो तर त्याच्यासारखा दुसरा आनंद या जगात नाही. व्यक्ती मेल्यानंतर त्याला चार खांदे निश्चित मिळतात, मात्र जिवंतपणी दु:खं हलकं करण्यासाठी, मोकळं होण्यासाठी एक खांदा मिळत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून आज शाररीक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व ही खूप मोठी व्याधी निर्माण झाली आहे. हे अपंगत्व दूर करण्यासाठी आपल्याला देता आलं पाहिजे. कारण जेवढं आपण देऊ तेवढं आपल्याला मिळत असतं. आपल्या अध्यक्षीय भाषणात ना. गिरीश महाजन यांनी सांगितले, की मी गेल्या २५ वर्षांपासून रुग्णसेवा करीत असून आतापर्यंत अडीच लाख रुग्णांवर उपचार झाले आहेत. व्यक्ती किती वर्ष जगाला याला महत्व नसून तो कसा जगाला याला महत्व आहे. त्यामुळे देण्याची भावना आपल्यामध्ये आली पाहिजे. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आ. राजूमामा भोळे, रतनलालजी बाफना, भरत अमळकर आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. याशिवाय प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थींचे मनोगत म्हणून एसडीसीड योजनेचा लाभ घेतलेले माया सोनावणे, मातोश्री आनंदाश्रामाच्या निर्मलाताई कुळकर्णी, दीपस्तंभ मनोबल केंद्राचे पंकज गिरासे यांनीही मनोगते व्यक्त केली. सर्व मान्यवरांनी अशी आगळी वेगळी प्रदर्शनी भरविल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन आभारही मानले. रातनलालजी बाफना यांनी प्रदर्शनामध्ये आलेल्या सर्व संस्थांना एकत्रीत *५ लाख* रुपयांची मदत जाहीर केली. मल्हार हेल्प फेअर’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व इतर विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्था, महानगर पालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या द्वारे दिली जाणारी मदत व योजनांची माहिती, नि:स्वार्थ, अविरत कार्य करणाऱ्या सेवा महर्षींची माहिती, दिव्यांग, अंध, अपंगांचा जिद्दीचा प्रवास आशा विविध प्रेरणादायी गोष्टी पाहायला, अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मोठ्या संखेने नागरिकांनी सेवावार्तींचे कार्य समजून घेण्यासाठी गर्दी केली होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन *गिरीश कुळकर्णी* तर आभार प्रदर्शन प्रशांत मल्हारा यांनी केले. प्रदर्शनीचे शेवटचे फक्त दोन दिवस बाकी असून मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट देऊन या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शानीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे आपण पाठवीत असलेले सर्व वास्तववादी लेख काळजीपूर्वक वाचतो, थोडा वेळ लागतो, पण खूप प्रेरणादायी असतात अन भावस्पर्शीही. मानवतेच्या हिताचे असतात. Avinash Saoji Thanks for your feedback. View all posts by : Admin Pravin Tirthgirikar अतिशय प्रेरणादायी व्यक्तीचित्रण…

Leave a Reply

Add address