Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

करोना को समझ लेते है। (डॉ रश्मी राऊत-गाडगीळ तथा डॉ अविनाश सावजी)

Leave a Reply

Categories
Uncategorized

डॉ अभय बंग (सेवांकुर युवा प्रेरणा शिबिर, आनंदवन, २००९)

Leave a Reply

Categories
Uncategorized

मी नाही तर कोण ? आता नाही तर केंव्हा ?

Leave a Reply

Categories
Uncategorized

भावेश भाटिया, महाबळेश्वर : डोळस अंधत्व

भावेश भाटिया, महाबळेश्वर 
२०१० मध्ये मी, माझीपत्नी सोहिनी मुलगा अपार सातारायेथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. एक दिवसथोडा मोकळा होता अपारची महाबळेश्वरबघण्याची फार तीव्र इच्छा होती, म्हणूनआम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्येप्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेशभाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचेवर्कशॉप आहे, तिथे१०१५ मिनिटांसाठीजावू नंतरपॉईंट्स बघू या म्हणून आधी भावेशकडेगेलो. भावेश भाटियानावाच्या अतिशय गोड व्यक्तिमत्वाच्याअंध व्यक्तीची झालेली तीपहिली भेट. तेथे त्यावेळी २५० प्रकारच्या सुगंधी डेकोरेटिव्ह मेणबत्त्यातयार केल्या जायच्यात. ते सर्व भावेशनेआम्हाला अतिशय जिव्हाळ्याने दाखविले. तो व त्याची पत्नी नीतासोबत बराच वेळ बोलत बसलो. दोन तास कसेगेलेत ते कळलेचनाही. तेथून निघतानामाझा २० वर्षांचामुलगा अपार म्हणालाकि, बाबा आतामहाबळेश्वरचे इतर पॉईंट्सनाही बघितले तरीचालेल. भावेशकडे आलो यातचसगळे महाबळेश्वर पाहण्याचाआनंद समाधानमळाले. जो अपारअतिशय आतुरतेने महाबळेश्वरपाहण्यासाठी म्हणून उत्सुक होतात्याचे हे उद्गारहोते; आणि खरोखरचआता महाबळेश्वराच्या पॉइंट्समध्येभावेश भाटिया यांच्यासनराईज कॅण्डल वॅक्ससंग्रहालय हा नवीनपॉईंट जोडल्या गेलेआहेत. 

भावेश मुळचा कच्छमधील. वडील उपजिवीकेसाठी महाराष्ट्रातगोंदियाला आलेले. भावेशची दृष्टीशाळेत असतानापासूनच त्यालाअसलेल्या रेटिनाच्या आजारामुळे कमीकमीहोत चाललेली. शाळेतीलइतर मुले त्यालाआंधळा म्हणून चिडवायची. १५१६ व्यावर्षी तर पूर्णतःअंधत्व आलेले. मात्र त्याची आई त्यालाम्हणायची तुला जगपहाता येत नसलेम्हणून काय झाले, असे काहीतरी करकि संपूर्ण जगतुझ्याकडे पाहायला लागेल. आईचेहे उद्गार त्याच्यासाठीकायम प्रेरणा देतराहिले. त्यामुळेच कदाचित भावेशपुढील आयुष्यात जगासाठीएक रोल मॉडेलबनला. दुर्दैवाने त्याचीआई पण याचदरम्यान कॅन्सरने गेली. तिच्याउपचारात बराच खर्चझाल्याने त्यांची आर्थिक परिस्थितीपण ढासळली होती. ते गोंदिया सोडूनमहाबळेश्वरला आलेत. तेथे उपजीविकेसाठी मिळेल ते कामकेले. भावेश लहानपणापासूनकल्पक सृजनशीलहोता. तो खेळणी, पतंग . अनेक कलात्मक वस्तू बनवायचा. तो १९९९ मध्येमुंबईच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमध्येमेणबत्त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणूनगेला. पण अंधांनाहे काम जमतनाही म्हणून मेणबत्तीऐवजी त्याला मसाजिंग प्रशिक्षणालाप्रवेश देण्यात आला. मसाजचेप्रशिक्षण घेत असतानामेणबत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांनामोफत  मसाजकरुन त्यांच्याकडून त्यानेमेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसातकेले. प्रशिक्षण पूर्णकरून महाबळेश्वरला परतआल्यावर तो मसाजिंगचेकाम करू लागला. पण मेणबत्ती बनविण्याचेत्याचे स्वप्न त्याला स्वस्थबसू देत नव्हते. त्याने घरच्या घरी मेणबत्त्याबनवून पाहणे सुरुकेले बाजारात५० रु. रोजाप्रमाणेभाड्याने घेतलेल्या ठेल्यावर त्यातो विकू लागला.

एक दिवस असाच भावेशबाजारात आपल्या ठेल्यावर मेणबत्या विकत होता. त्यादिवशी महाबळेश्वरलाहवापालट करण्यासाठी म्हणून काहीदिवस रहायला आलेलीनीता नामक युवती फिरत फिरत त्याच्या ठेल्याजवळ आली. एक अंध व्यक्ती मेणबत्त्या विकतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने भावेशबद्दल सविस्तर चौकशी केली. भावेशचाप्रामाणिकपणा, जिद्द पाहून तीप्रभावित झाली  दररोज त्याच्या कामात त्याला मदतकरायला म्हणून येऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री झाली ते प्रेमातकधी पडले हे त्यांना कळलेच नाही. दोघांनी लग्न करण्याचानिर्णय घेतला. एका अंधमेणबत्ती बनवून विकणाऱ्या गृहस्थाबरोबर, सर्व काहीव्यवस्थित असलेली नीता लग्नकरते म्हटल्यावर तिलाकुटुंबियांच्या विरोध होणे स्वाभाविकचहोते; पण नीताआपल्या निर्णयावर ठाम होती. तिने आपल्या आईवडिलांना राजी केले. वर्षभरानंतर त्यांचे लग्न झाले. लग्न करून त्यांनीमहाबळेश्वरलाच एका छोट्याशाघरात संसार थाटला. अन्न ज्या भांड्यांमध्ये शिजवायचे त्याचभांड्यात मेणबत्त्या बनविण्यासाठी मेणवितळविले जायचे. कारण त्यासाठीवेगळी नवीन भांडीखरेदी करण्याची पणत्यांची परिस्थिती नव्हती. मात्र आता नीता सोबत आल्याने भावेशच्या कामाला चांगलीच गती आली व त्यांचा व्यवसाय वाढू लागला. हळूहळूदोघांनी कष्टातून एक दुचाकीवाहन खरेदी केले. लग्नापूर्वी सायकलसुद्धा चालविता येणारी नीता आतादुचाकी पुढेचारचाकी वाहन पण चालवायलाशिकली.

भावेशने सुरुवातीला अनेक मेणबत्तीनिर्माते आणि संस्थांकडूनमार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणावा तास प्रतिसाद मिळालानाही. बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांनीही नकारदिला. भावेश नीतासोबतमॉलमध्ये जाऊन तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्यांना स्पर्शकरून, त्यांचा आकारआणि बनावट समजूनघ्यायला लागला. अशाप्रकारे मेणबत्तीबनविण्याचे कौशल्य त्याने हळूहळू आपल्या कल्पकतेने विकसितकरीत नेले. पुढेएका बँकेने त्याला१५ हजार रुपयेकर्ज दिले. त्यातूनत्यांनी कच्चा माल साचे खरेदी केले सनराइज कँडल हि कंपनी सुरुकेली. आज याकंपनीचा वार्षिक टर्नओव्हर २५कोटी रुपयांपेक्षा जास्तझाला आहे. किलो मेणापासून सुरुवातकेलेल्या भावेशला आता दररोज १२५ क्विंटल मेणमेणबत्त्या बनविण्यासाठी लागते. मेणबत्ती बनविण्यामध्येस्वतःची कल्पकता सृजनशीलतावापरून विविध प्रकारच आकर्षकसुगंधी शोभनीयमेणबत्त्या ते बनवूलागले. हळूहळू त्यांच्या मेणबत्यांनागमाहक आवर्जून खरेदीकरू लागले. ठेल्यावरहोणारी विक्री पुढे दुचाकी नंतर व्हॅनमधूनहोणे सुरु झाले.

आज जवळपास १००००विभिन्न प्रकारच्या मेणबत्त्या भावेशचीकंपनी तयार करते. त्याच्या कंपनीत काम करणारेबहुतेक सर्व कर्मचारीअंध आहेत. आतापर्यंतदेशभरातील २३०० अंधांनाभावेशच्या कंपनीच्या मार्फत प्रशिक्षण रोजगार उपलब्धकरून देण्यात आलेलाआहे. एकूण ७अंधांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्थाभावेशच्या कंपनीमार्मत महाबळेश्वर येथेसध्या उभी करण्यातआलेली आहे. त्यांनाभोजननिवास व्यवस्थेशिवाय त्यांना स्टायपेंड पण प्रशिक्षणकालावधीमधे दिलेजाते. आपापल्या गावीपरत गेल्यावर मेणबत्त्याबनविण्यासाठी आवश्यक ती मदतमार्गदर्शन सुद्धा पुरविलेजाते.

अंध व्यक्तिना डोळे नसलेतरी अंत:चक्षूंनीते जग पाहूशकतात, हेभावेशने सिद्ध करून दाखवलेआहे. या व्यवसायानेभावेशचे नाव देशातच नव्हे तर जगाच्यापाठीवर पोहोचले आहे. भावेशनेमोठ्या कठीण परिस्थितीतसुरु केलेला व्यवसाययशस्वी करून दाखवलाआहे. आज रिलायन्सइंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणिरोटरी क्लब सारखेमोठे ब्रॅण्ड्स त्यांचेनियिमत गमाहक आहेत. आजसंपूर्ण देशभरात तसेच जगातील६० देशांमध्ये त्यांच्यामेणबत्त्या निर्यात केल्या जातात. या सर्व कामातभावेशची पत्नी नीता हिचीखूपच मोलाची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज ती कंपनीचीप्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतआहे. दृष्टीहीन तरुणांनास्वावलंबी बनविणे हे नीताआणि भावेश यांनीआपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानलेआहे तेत्यासाठी सतत प्रयत्नरतआहेत.

भावेश गोंदियाला शाळा शिकतअसतांनाच त्याची दृष्टी कमीव्हायला लागली होती. मात्रभावेश लहानपणापासूनच धाडसीस्वभावाचा होता. सायकल चालविणे, आसपासच्या टेकड्याडोंगर चढणे, मनापासून निसर्गाचा आनंद आस्वाद घेणे हात्याचा स्वभाव होता. १९८८साली वयाच्या सतराव्यावर्षी अकरावीला असतांनात्याने ठरविले की राष्ट्रीयएकात्मता हा विषयघेवून गोंदिया तेकाठमांडूनेपाळ अशी सायकलनेयात्रा करायची. त्याच्यासोबत पोलिओझाल्यामुळे पायांमध्ये ताकद नसणारात्याचा मित्र पम्मी मोदी दिनेश पटेलहा डोळस मित्र पण तयार झाला. त्यांनी सायकलमध्ये काही बदलकरवून दोन पायडल काही गिअर्सबसवून घेतले. पायवापरु शकणारात्याचा मित्र पम्मी समोरबसून हँडल पकडायचा. भावेशला दिसत नसल्यामुळेतो मागे बसायचा पायडल मारायचेकाम करायचा. अशीडबलसीट साकयल चालविण्यासाठी बराचकाळ त्यांनी सरावकेलेला. गोंदिया ते काठमांडू परत अशी५६२० किमीची सायकलयात्रात्यांनी ४५ दिवसातपूर्ण केली. दिनेशपटेल हा डोळस मित्र पण दुसऱ्या सायकलवरत्यांच्यासोबत यात्रेमध्ये होता. यासायकल यात्रे दरम्यानभावेशच्या पुढील आयुष्यातील वाटचालीचीबरीचशी बीजे रुजल्यागेलीत. या जगामध्येचांगुलपणा सगळीकडे ठासून भरलेलाआहे, वाईट माणसांचीसंख्या ही चांगल्यांच्यातुलनेत खूपच कमीआहे हे तोशिकला. नाना प्रकारच्याअडचणींना सामोरे कसे जावे, आपल्या उद्दीष्टांसाठी पैशांची जुळवाजुळव कशीकरावी, लोकांचे सहकार्य कसे मिळवावे . शिकलेल्याअनेक गोष्टी पुढीलआयुष्यात त्याला उपयोगी पडल्यात.

१९९९ साली भावेशनेप्रथमच दिव्यांगांसाठी जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रिडास्पर्धेमध्ये वाच २८व्या वर्षी भागघेतला. सातारा जिल्हास्तरावरील यास्पर्धेमध्ये त्याने अनेक क्रिडाप्रकारांमध्येसहभाग नोंदवला तेथून त्याच्या क्रिडा क्षेत्रातील वाटचालीला सुरुवात झाली. आतार्पंयत थालीफेक, गोळाफेक भालाफेक यामध्ये त्याने राज्य राष्ट्रीय स्तरावरील११४ पदके प्राप्तकेलेली आहेत. नुकतीच त्याची२०२० साली टोकिओयेथे होणार्यापॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या देशातर्फे निवड झालेली आहे. देशासाठी सुवर्णपदक आणण्याचा त्याचासंकल्प असून त्यासाठीतयारी सुरू केलेलीआहे. एकीकडे आपल्यासनराईज कॅन्डल या कंपनीलाभरभराटीला घेवून जात असतांना, सोबतच त्याची यास्पर्धांसाठीची तयारी पण तेवढ्याचजोमाने सुरु आहे

२००८ मध्ये वयाच्या चाळीशीमध्येते काश्मीरला श्रीनगरसोनमर्गकारगिलला गेलेअसता, हिमालयाच्या शिखरांनीत्याला साद दिली. लहानपणी जवळपास डोंगरांवर चढण्याचाउद्योग भरपूर केलेला. आतावयाच्या चाळीशीनंतर पुन्हा मित्रांसोबतट्रेकिंग गिर्यारोहणालासुरुवात केली. आतापर्यंत सह्याद्रीपर्वताचे सर्वात उंच शिखरकळसूबाई सहा वेळाचढून झाले. हिमालातीलकांगरा हे ६१२०मीटर उंचीचे शिखरपण काबीज झाले. आता पुढची चढाईही ६७५० मीटरउंचीच्या मीरा याशिखरावर होणार आहे. २०१९मध्ये जगातील सर्वातउंच शिखर माऊंटएव्हरेस्ट काबीज करण्याचा भावेशचासंकल्प आहे. त्यावेळीबहुधा तो माऊंटएव्हरेस्ट चढून जाणाराजगातील पहिला दृष्टीहिन व्यक्तीअसेल.

सन २०१९ चीमाऊंट एव्हरेस्ट मोहिम २०२० मधीलटोकिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठीसुवर्णपदक या ध्येयासाठीभावेश स्वत:लातयार करतो आहे. त्यासाठी त्याचा दररोजमैदानावर कठोर परिश्रम सराव सुरुअसतो. रोज १० किमीधावणे, ५०० पुशअप्स शारिरिक तंदुरुस्तीसाठीचीअन्य साधना त्याचीअव्याहतपणे सुरु आहे. पोलो मैदानावर धावण्याच्यासरावासाठी त्याची पत्नी नीता गाडीड्राईव्ह करते, गाडीला मागेएक १५ मुटाचादोर बांधलेला असतो, तो हातात धरुनभावेशने गाडीच्या मागे धावायचेअशी त्याची दररोजचीसर्कस सुरु असते. भावेश गमतीने सांगतोकी मला माझ्यापत्नीशी खूप सांभाळूनवागावे लागते. कारण एखादंदिवशी काही कमीअधिकझाले तर सकाळीधावतांना ती गाडीचावेग वाढवून देणचाधोका असतो !
एकदा रिलायन्सतर्फे भावेशचा सत्कार केलागेला त्यालामदत म्हणून ५१लाखांचा चेक दिलागेला. भावेशने तो नम्रपणे परत केला त्याऐवजी रिलायन्सनेत्याला काम द्यावेअशी विनंती केली. अशाप्रकारे दिलेला चेक नाकारणारीव्यक्ती कदाचित रिलान्सला पणक्वचितच भेटली असावी. बर्याच बैठकांनंतरभावेशच्या कंपनीला रिलायन्सकडून काम मिळाले नंतर त्यांच्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारावर दरवर्षीच मिळत गेले. त्या नाकारलेल्या ५१लाखांच्या चेकच्या बदल्यात गेल्याकाही वर्षात त्यानेरिलायन्सकडून कैक कोटीरुपयांच्या आर्डर्स मिळवून पूर्णकेल्यात; यामध्ये भावेशची दूरदृष्टी भक्कम व्यावसायिकदृष्टीकोन लक्षात येतो.

मेणबत्या तयार करतांनाजे मेण वायाजायचे त्याचे कायकरावे हा मोठाप्रश्न त्यांच्यापुढे होता. कारण अशाप्रकारच्या वेस्टेज मेणाने गोदामेभरलेली होती. बऱ्याविचारांती त्यांनी यापासूनपुन्हा नविन मेणबत्यातयार करायला घेतल्यात. पण त्यामध्ये विविधप्रकारचे रंग प्रकार असल्याने तेसगळे एकत्र मिसळल्यागेल्याने त्यापासून बनविलेल्या मेणबत्यादिसायला चांगल्या नव्हत्या. पुन्हाविचारचिंतन सुरुझाले. शेवटी त्यामध्येकाळा रंग मिसळूनसंपूर्ण काळ्या रंगाच्या मेणबत्त्यातयार करण्यात आल्यात त्या विक्रीसाठीदुकानांमध्ये पाठविल्यात. बरेच दिवसझालेत तरी त्यातशाच पडून होत्या. काळ्या रंगामुळे त्यांना ग्राहक मिळेना. पुन्हा भावेशची चौकटीबाहेरविचार करण्याची सवयकामी आली. त्यानेअसा प्रचार करणेसुरू केले कीया काळ्या रंगाच्यामेणबत्त्या वातावरणातील सर्व नकारात्मकगोष्टींना दूर ठेवतात! आणि झाले ! ज्यामेणबत्त्यांना एकही ग्राहक घेत नव्हता, त्यामेणबत्त्यांना इतकी मागणीआली की पुढलेकाही महिने त्यांनाबाकी सर्व कामेबंद ठेवून, केवळवेस्टेजमधूनच नाही, तर नविनमेणापासून फक्त काळ्यारंगाच्याच मेणबत्त्या बनवाव्या लागल्यात.  
भावेशच्या वाटचालीत त्याची पत्नीनीता हिचा पणबरोबरीचा वाटा आहे. तिने भावेशकडे तोदृष्टीहिन आहे अशानजरेने कधीच बघितलेले/वागवलेले नाही. त्यामुळेपण स्वत:च्यादृष्टीहिनतेच्या मर्यादांवर मात करण्यासाठी एक नॉर्मलव्यक्ती म्हणून जगण्यासाठी भावेशलामोलाची मदत झाली. नीताचा खंबीर पाठिंबा आयुष्यातील प्रत्येक वळणावर असलेलीभक्कम सोबत यांच्याचआधारे, एरव्ही डोळस व्यक्तीपण धजावणार नाही, अशा प्रकारची नवनवीनआव्हाने तो स्विकारू यशस्वी करूशकला.
महाबळेश्वरयेथील त्यांच्या कंपनीमधेतुम्ही त्यांचं काम पाहूशकता. तसेच त्यांनीआता महाबळेश्वर येथेवैक्स म्युझियम पणतयार केलेले आहे अनेक थोरव्यक्तींचे मेणाचे पुतळे यासंग्रहालयात तयार केलेलेआहेत.

एवढे सगळे यश मिळवूनसुद्धा भावेश व नीता दोघेही अत्यंत नम्र, गोड व प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेले आहेत. त्यांना मिळालेल्या सर्वच गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये कृतज्ञताभाव, जो हल्ली दुर्मिळ झालेला आहे, अगदी ठासून भरलेला आहे व कदाचित एवढ्या उत्तुंग यशामागे ते एक महत्वाचे कारण असावे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह..

Leave a Reply

Categories
Uncategorized

सचिन बुरघाटे, अकोला…ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है!

श्री. सचिन बुरघाटेअकोला 
जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या सचिनला सातपैकी चार विषयात ३५ तर दोन विषयात ३६ मार्क्स मिळाले होते. हा आरंभबिंदू असणारा ५२३ लोकसंख्येच्या अकोला जिल्ह्यातल्या एका खेड्यातील हा मुलगा वयाच्या २५-३० मध्येच हजारो व्यावसायिकांना इंग्रजी व व्यक्तिमत्तव विकासाचे धडे देणारातरुण यशस्वी उद्योजक व प्रभावशाली वक्ता/प्रशिक्षक बनतो अशी गगनभरारी घेणाऱ्या सचिनची हि संघर्षमय व प्रेरणादायी जीवनकहाणी.  
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ५२३ वस्तीचे लाडेगाव हे सचिनचे गाव. आईवडील जेमतेम दुसरा वर्ग शिकलेले. इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेले सरकारी झोपडीवजा घर. इतरांच्या शेतात कामाला जाऊन रोजीरोटी कमविणे; जोड म्हणून सचिनच्या वडिलांनी एक छोटेसे घरगुती किराणा दुकान पण सुरु केलेले. सचिन गावच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात अगदीच सर्वसाधारण व इतरही कुठल्याच बाबतीत काही विशेष सांगावे अशी ओळख नसलेला सचिन कसाबसा ३५ टक्के मार्क मिळवून सातवी पास झाला. तो आठवीत असताना घडलेल्या एका छोट्याशा घटनेने त्याच्या आयुष्यात बदलाला सुरुवात झाली असे तो सांगतो. त्याच्या गणिताच्या शिक्षकांनी त्याला पुढे बोलावून एक गणित सोडवून दाखविले व आता तू हे इतर मुलांना समजावून सांग असे सांगितले. बस, एवढेसे प्रोत्साहन सचिनसाठी ठिणगी ठरले. त्याला वाटले कि ज्याअर्थी शिक्षकांनी मला हे करायला सांगितले याचा अर्थ मला गणित येते व आपण काही स्वतःला समजतो तसे अगदीच टाकाऊ नाही आहोत. त्या दिवसापासून आपल्यामध्ये काहीतरी वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले. तो नेटाने अभ्यास करायला लागला व दहावीला चक्क ५५ टक्के मार्क्स घेऊन पास झाला. एवढे मार्क्स मिळविणे म्हणजे त्याच्या दृष्टीने बरीच मोठी प्रगती होती. 
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अभ्यासात हुशार असलेल्या लहान भावाने शिक्षण घ्यावे व सचिनने घरचे किराणा दुकान सांभाळावे असे वडिलांनी सुचविले. किराणा सामान आणण्यासाठी एवीतेवी १०-१२ किमी अंतरावरच्या तालुक्याच्या गावी सायकलने जावे लागायचे. मग तेथे असलेल्या महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घ्यावा असा त्याने विचार केला. सकाळी ११ पर्यंत दुकान चालवायचे, त्यानंतर अकोटला येऊन कॉलेज करायचे व परत जाताना दुकानासाठी लागणारे किराणा सामान घेऊन जायचे व संध्याकाळी पुन्हा दुकान चालवायचे, अशी व्यवस्था होऊन सचिनचे शिक्षण सुरु राहिले. त्याचे गणित जरा बरे असल्याने व दुकान चालवीत असल्याने अकाउंट्स या विषयात त्याला आवड निर्माण झाली. अकरावीला सत्र परीक्षेत एका विषयात त्याचा वर्गातून पहिला नंबर येऊन १० रुपयांचे पेन त्याला बक्षीस मिळाले. सचिन सांगतो, “ऊस दिन जैसेही सरने ये घोषित किया कि मेरा पहला नंबर आया है और बक्षीस लेने हेतू मुझे सामने बुलाया तब जिंदगीमें पहली बार अपने आपसे मुलाकात हो गई. ज्यादातर हमें तो अपने आपसे मिलनेका समय हि नही मिलता, इसीलिये हमे खुदकी हि असली पहचान नही होती है”. या नवीन ओळखीमुळे सचिनची अभ्यासाची गोडी वाढली. बारावीत त्याला खूपच चांगले मार्क्स मिळालेत. त्यावेळच्या रूढीप्रमाणे त्याने डीएड करावे असा आग्रह वडिलांनी धरला व त्याला नागपूरला प्रवेश दिला. मात्र सचिनचे मन त्यात रमले नाही व दोन महिन्यातच तो हट्टाने डीएड सोडून घरी परत आला. त्यामुळे रागावलेल्या वडिलांनी त्याच्याशी बोलणेच बंद केले. वडिलांचे आपल्याबद्दल झालेले हे नकारात्मक मत कधीतरी बदलावे यासाठी जिद्दीने तो पेटून निघाला व आमूलाग्र बदलला. मात्र वडिलांचे मत बदलण्यासाठी त्याला सहा वर्षे वाट बघावी लागली. 
सचिनने अकोटलाच बीकॉमला प्रवेश घेतला. येथेच त्याने आयुष्यातील पहिले भाषण दिले. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला व सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तो इंग्रजीमध्ये करायला लागला.  लवकरच वक्ता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पुढच्या शिक्षणासाठी थोडे पैसे मिळावेत यासाठी त्याने याच काळात एसपीएस कोचिंग क्लास सुरु केला. त्याच्या शिकविण्याचा अनेकांना फायदा होत गेला व जर सचिनने शिकविले तर कोणी नापास होणार नाही अशी त्याची ख्याती झाली. बीकॉम पूर्ण झाल्यावर पुण्याला एमबीए करायला जाण्याचे ठरविले. पैशांची बोंब होतीच. मित्र-परिचितांकडून पैसे जमा करून जाण्याची सोय झाली. दीड वर्षे केवळ एकवेळचे खाऊन शिक्षण पूर्ण केले. आळंदी रोडवरच्या गजानन महाराज मंदिरात आरतीनंतर प्रसाद म्हणून खिचडी मिळायची, म्हणून तो व त्याचा मित्र दर गुरुवारी प्रसादाच्या रांगेत उभे राहून मिळालेल्या प्रसादामध्ये पोटाची भूक भागवू लागले. मात्र पुढे नोकरी मिळाली व पहिला पगार मिळाला तेंव्हा पण ते रांगेमध्ये उभे होते, फक्त त्यादिवशी आजचे अन्नदाते म्हणून सचीन व त्याच्या मित्राचे नाव समोर बोर्डावर लिहिलेले होते. आपल्याला मिळालेले काही अंशी समाजाला परत करण्याची वृत्ती तेंव्हापासूनच त्याच्यामध्ये जोपासल्या गेली. 
दोन वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर मात्र आपल्या भागातील लोकांना आपली जास्त गरज आहे व शिकविणे हि आपली प्याशन आहे हे लक्षात आल्याने २००९ साली नोकरी सोडून अकोला येथे परत येण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. इंग्रजी भाषेची भीती घालविण्यासाठी व केवळ इंग्रजी येत नसल्याने आत्मविश्वास कमी राहतो व इतर सर्वकाही असूनही आपण मागे पडतो या स्वतःच्या वाटचालीतील अनुभवामुळे त्याने अकोल्याला इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी अस्पायर‘ नावाची संस्था सुरु केली. भाषा शिक्षणाची सहज पचनी न पडणारी हि त्यावेळची सर्वस्वी नवीन संकल्पना, २००९ मध्ये केवळ १३ प्रशिक्षणार्थीना घेऊन सुरु झालेला प्रवास, आज रोजचे १५००-२००० विद्यार्थी येथपर्यंत येऊन पोहचला आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये ‘अस्पायर‘ द्वारा ४०००० डॉक्टर्सवकील, सीएगृहिणीज्येठ नागरिक व विद्यार्थी अश्या सर्वानाच इंग्रजी भाषा व सॉफ्ट स्किलसचे प्रशिक्षण दिले गेले आहे. केवळ जिद्दआत्मविश्वास व अफाट मेहनतीच्या जोरावर हे शक्य झाले आहे. आज सचिन हजारोंचा आयकॉन बनलेला आहे. त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तीनही पिढ्याचे प्रतिनिधी असतात. यातून अनेकांची आयुष्य बदलू शकलीत. सामान्य लोकांनाही शक्य व्हावे यासाठी अतिशय माफक शुल्क आकारून अस्पायरअनेकांचे आयुष्य बदलन्याचे काम करीत आहे.  
देश विदेशातील तीन लाखपेक्षाही जास्त श्रोत्यांसमोर व तेही मुख्यत्वे इंग्रजी/हिंदी भाषेमध्ये विविध विषयावर मुख्य वक्ता म्हणून सचिन बोललेला. स्वतःच्याच गावात तिकीट लावून नियमितपणे हजारो लोक त्याचे भाषण ऐकायला येतात, कदाचित कुठल्याच वक्त्याला न जमलेला हा चमत्कार त्याने करून दाखविलेला आहे.  
तिशीमध्येच एवढे मोठे यश मिळवूनही, सचिन आताही अतिशय विनम्र व सौजन्यशील आहे. उलट सामाजिक बांधिलकीसुद्धा जपतगावांमधील शेकडो गरीब मुलामुलींना विविध प्रकारे स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तो सातत्याने मदत-मार्गदर्शन करीत असतो.
समजत नसणाऱ्या वयात कधीतरी त्याला विचारल्या गेलेल्या तू कशासाठी जन्म घेतलाय या प्रश्नाचे त्याने त्यावेळी दिलेले उत्तर पुढील आयुष्यात खरे करून दाखविले. ते उत्तर होते ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है, ऊस अधूरेपन को दूर करने के लिये हम पैदा हुए है” 

संपर्क :
Aspire- The Institute of Human Development Sahakar Nagar, Gaurakshan Road, Akola
Office: 8275726017/16
Email: sachinburghate@gmail.com
URL: www.aspire.ihd.com

Leave a Reply

Categories
Uncategorized

“देवा.. खेळ मांडला”.. तेजस नाईक, जळगाव

देवा.. खेळ मांडला“..

२०१२ मध्ये जळगावच्या बालगंधर्व या खुल्या नाट्यगृहात झालेल्या प्रयासच्या पहिल्याच “सेवांकुर लिटल चॅम्प्स” या अत्यंत प्रेरणादायी स्टेज-शो कार्यक्रमात श्रोता म्हणून आठवीत असलेला तेजस नाईक त्याच्या आईसोबत आलेला होता. कुणीतरी मला त्याच्याबद्दल सांगितले. मी त्याला ५ मिनिटांसाठी एका बाजूला बोलवून घेतले व त्याच्याशी बोललो. लगेच त्याला व त्याच्या आईला स्टेजवर कार्यक्रमामध्ये सादरीकरणासाठी बोलावून घेतले. त्याला व त्याच्या आईला त्यांची कहाणी शेअर करायला सांगितले. जाहीरपणे एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर स्वतःची कहाणी सांगण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तेजसने आपली कहाणी सांगितली. त्याच्या आईनेही त्या सगळ्या आठवणी डोळ्यातील अश्रूंसह जागविल्यात. चौथ्या वर्गात असताना त्याला चिकनगुनिया झाला व त्यातच संपूर्ण शरीरातील स्नायूंची ताकद कमी होत गेली. पुण्याला तो पन्नास दिवस अति गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती होता. हळूहळू तो त्यातून बरा झाला. मात्र त्याच्या डोळ्यांवर झालेला परिणाम मात्र कायमचाच राहिला व त्याची दृष्टी कमी व्हायला लागली. पुढे तर पूर्ण अंधत्वच आले. अचानक झालेल्या या आघाताने संपूर्ण घरचं सैरभैर झालेले. तेजस पण निराश झालेला. त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी पुन्हा स्वतःला समजावत त्याला गुंतविण्यासाठी संगीताचा क्लास लावून दिला. तेजसच्या मुळातच छान असलेल्या आवाजाला पैलू पडल्या गेलेत व तो गाण्यामध्ये रमत गेला. गायनातच पुढे काही करावे असे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. मी त्याला एक गाणे सादर करायला सांगितले. त्यावेळी त्याने “देवा.. खेळ मांडला”.. हे गाणे अप्रतिम सादर केले. त्यानंतर मी एकच वाक्य बोललो, तेजस एक दिवस याच खुल्या रंगमंचावर आम्ही तिकीट विकत घेऊन तुझे गाणे ऐकायला येऊ, तिथपर्यंत तुला पोहचायचे आहे; समोर बसलेल्या ४००० + प्रेक्षकांना आवाहन केले कि तेजसला तेथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. कोण तयार आहे त्यांनी हात वर करावेत, आणि अनेक हात वर आलेत. ते पाहून तेजस व त्याच्या आईला आणखीनच हिंमत आली.
“जीवनाशी लढणाऱ्या कणखर मुलांची गोष्ट” अशी संकल्पना असणाऱ्या “सेवांकुर लिटल चॅम्प्स” या कार्यक्रमात ज्यांच्या आयुष्यात खूप आव्हाने असूनही ज्यांनी हार तर मानलीच नाही, उलट काहीतरी विशेष कामगिरी करून दाखविलेली आहे अशा मुलांना बोलतं करून त्यांची लढाई सर्वांपुढे आणली जाते. पहिल्या कार्यक्रमापासूनच ३-४ हजार प्रेक्षकांची उपस्थिती मिळालेला हा कार्यक्रम पुढे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला व प्रत्येक ठिकाणी असाच प्रतिसाद मिळालेला. हा कार्यक्रम पाहून, त्याच्या डीव्हीडी पाहून हजारोंच्या आयुष्यातील निराशा दूर व्हायला मदत झाली. काहींनी तर आता आत्महत्येचा बेत कॅन्सल केला येथपर्यंत प्रतिक्रिया दिल्यात. यातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, अहमदनगर, शिरपूर व इतरही अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये तेजस या कार्यक्रमाचा एक भाग राहिलेला. बहुतेक ठिकाणी त्याचे आईवडील पण सोबत असायचेत. त्याच्या आवाजातील “देवा.. खेळ मांडला”.. हे गाणे मला अतिशय आवडायचे व दरवेळी मी त्याला ते गाणे म्हणायला लावायचो.
तेजस सामान्य मुलांच्या सोबतच जळगावच्या एका शाळेत शिकला. प्रत्येक वर्षी, शाळेतील तीन तुकड्यांमधून तो कायम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचा. दहावीला तर त्याला ८५ % गुण मिळालेत. पुढे अकरावी बारावीमध्येही संगीतामधील त्याचे शिक्षण व प्रगती सुरूच होती. अनेक ठिकाणी त्याला कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी निमंत्रणे यायला लागलीत. एकदा तर प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरीं समोर त्याचे गाणे झालेले आणि आतातर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचेसोबत पण त्याला गाण्याची संधी मिळणार होती, इतक्या उंचीवर तो संगीतामध्ये पोहचलेला होता.
अमरावती येथे दरवर्षी होणाऱ्या स्पार्क या प्रयासच्या निवासी उन्हाळी शिबिरात तो अकरावीला असताना सहभागी झालेला. त्यापूर्वी त्याच्या आईने त्याला स्वतःच्या आईकडेसुद्धा एका रात्रीसाठी पण एकटे ठेवलेले नव्हते. पण या शिबिरात मात्र निश्चितपणे सात दिवसांसाठी त्याला एकट्याला सोडून त्या गेल्यात, एवढा त्यांचा प्रयासवर विश्वास होता. शिबिरामध्ये तो एकटाच दिव्यांग होता. मात्र त्याने इतर शिबिराथींच्या बरोबरीने शिबिरात झालेल्या सर्वच कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला, अगदी झाडावर चढणे, पारंब्यांना लटकून झोके घेणे, ट्रेकिंग, बाहेरच्या असाइन्मेंट्स असतील, सर्व काही केले. सात दिवसाच्या या शिबीराने त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असे त्याची आई वडील कायम सर्वाना सांगत असतात.
जळगावला असलेल्या यजुर्वेंद्र महाजनांच्या यांच्या दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेच्या, दिव्यांगांसाठी असणाऱ्या मनोबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तो आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन गेल्या दोन वर्षांपासून तयारीला लागला होता. सोबतच स्थानिक महाविद्यालयामध्ये बीए दुसऱ्या वर्षाला तो शिकत होता. आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाने तो सर्वांचा अतिशय लाडका बनला होता. त्याचा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व उंच झेप घेणारी स्वप्ने अनेकांना प्रेरणा देऊन गेलीत. 
दुर्दैवाने नियतीने पुन्हा एकदा त्याच्यावर घाला घातला व १ महिन्यापूर्वी त्याला डेंग्यूची लागण झाली. ३-४ दिवसातच आजार वाढत गेला व त्याची पुन्हा एकदा मृत्युसोबतची लढाई सुरु झाली. सुरुवातीला जळगाव व नंतर औरंगाबादला त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण दुर्दैवाने यावेळी तो हरला व दि. २७ ऑक्टोबर २०१७ ला रात्री त्याने या जगाचा निरोप घेतला. कदाचित देवाला पण त्याचे गाणे इतक्यातच ऐकायची इच्छा झाली असावी. तेजस एवढा गोड व लाघवी आहे कि परमेश्वर पण त्याला कायम आपल्या जवळ ठेवेल, यात मला अजिबात शंका नाही.
त्याचे वडील शिक्षक आहेत, तर आई गृहिणी. त्यांच्यावर ओढवलेल्या या आभाळा एवढ्या आपत्तीमधून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो एवढीच प्रार्थना…
खरेतर “आम्ही बी घडलो” या लेखमालेत तेजसबाबतचा लेख कधीतरी लिहिला जाणार होताच, पण दुर्दैवाने नुकताच त्याने या जगाचा निरोप घेतल्यामुळे त्याला या लेखाद्वारेच अखेरची श्रद्धांजली अर्पण करावी लागते आहे …. 

Leave a Reply

Categories
Uncategorized

कॅन्सरशी मैत्री करू या !

मागील १० दिवसात मुंबई व नागपूर येथील कॅन्सर झालेल्या दोन व्यक्तींशी प्रत्येकी २० मिनिटे फोनवरच बोलणे झाले. कॅन्सरबद्दल काही बेसिक माहिती, कॅन्सर होण्यामागे व तो बरा होण्यासाठी/नियंत्रणात  ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत, आहार व मनाच्या पातळीवर करता येण्यासारखे बदल इ. संदर्भात बोललो, काही पुस्तके वाचायला सुचाविलीत, त्या संवादाने त्यांच्या मनावरचा भर कमी झाला, प्रथमच कोणीतरी असे आश्वासक बोलल्याने खूप बरे वाटले व आजाराशी लढण्याला आणखी बळ मिळाले असे त्यांनी सांगितले. माझा तो दिवस खूप छान व सार्थकी लागला या आनंदात गेला. 
एकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Categories
Little Champs motivation Positive Attitude Sevankur Wardha

लिटल चॅम्प्सनी दिली जगण्याची नवी उमेद!

2500 audience, 3.5 hours long, highly inspiring-heart touching, “Sevankur Little Champs” at Wardha on 19 Feb. 
Read in Loksatta 

लिटल चॅम्प्सनी दिली जगण्याची नवी उमेद!

Leave a Reply

Categories
Uncategorized

माझा शैक्षणिक प्रवास

माझा शैक्षणिक प्रवास
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मगावीच माझे दहावी-बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरी निम्न मध्यमवर्गीय व्यापारी कुटूंबाची पार्श्‍वभूमी. घरामध्ये कुणी फार जास्त शिकलेले नव्हते. १०+२ या अभ्यासक्रमाची माझी पहिली बॅच. १९७५ साली दहावी, तर १९७७ साली बारावी झालो. अभ्यासामध्ये सुरवातीपासून चांगला होतो. चौथी व सातवीला स्कॉलरशिप परिक्षा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. दहावीला नागपूर बोर्डातून गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व संपूर्ण बोर्डातून मराठीमध्ये प्रथम, गणितामध्ये द्वितीय, तर विज्ञानामध्ये तिसरा क्रमांक आलेला. बारावीच्या परिक्षेत सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. पुढे नागपूर शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवीसुध्दा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.
मागे वळून पाहिले असता हे जे काही शैक्षणिक यश मी मिळवू शकलो, त्याची कारणे काय असावीत याचा विचार करतो तेंव्हा काय वाटते ते तुमच्याशी शेअर करतोय. माझे गाव सिंदखेडराजा हे तसे आडवळणाचे, जेमतेम ८००० लोकवस्तीचे. आता तालुक्याचे केंद्र झालेय. तेंव्हा तालुका सुध्दा नव्हता१९७५ साली म्हणजे आज पासून ३७ वर्षांपूर्वी इतर कुठल्याही आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, फारशा मार्गदर्शनाची शक्यता तर नव्हतीच. मग असे असतांना १०-१२ वी ला आणि पुढे सुध्दा जे यश मी मिळवू शकलो याची कारणे शोधली असता एक लक्षात येते, ते म्हणजे लहानपणापासून वाचनाची असलेली आवड. त्याकाळात सिंदखेडराजासारख्या छोट्याशा आडवळणाच्या गावात वाचायला तरी काय मिळणार ? पण घरी किराणा दुकाण असल्याने सामान बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भरपूर असायची; त्यातून शनिवार-रविवारच्या पुरवण्या काढून वाचायचो. पुढे सातवी-आठवीमध्ये असतांना रहस्यमय कांदबर्‍या वाचायला लागलो. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळापहाड इ. रहस्यकथा लोकप्रिय होत्या. १००-१५० पानांचे पुस्तक साधारणत: तासाभरात वाचून होत असे. नववीमध्ये असतांना हिंदी वाचनाची सुरूवात झाली. गुलशन नंदा, रानू इ. लेखकांचे उपन्यास त्याकाळी चलनात होते. दहाव्या वर्गात असतांना अशी निदान १०० तरी पुस्तके मी वाचली असतील. घरचे रागावतील म्हणून अभ्यासाच्या वही-पुस्तकामध्ये लपवून वाचायचो. २००-२५० पानांचे पुस्तक दोनेक तासात वाचून संपवायचो. ही जी वाचनाची आवड होती, त्यामुळेच वाचनाचा वेग वाढला, शब्दभांडार समृद्ध झाले व अभिव्यक्ती पण सुधारली असावी. त्यामुळेच कदाचित मराठी विषयामध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवू शकलो. हे केवळ मराठी विषयाच्या अभ्यासाने नक्कीच शक्य झाले नसते.
दहावीला गणितामध्ये १४९ मार्क मिळवून बोर्डात दुसरा क्रमांक होता. हे पण केवळ गणिताच्या पुस्तकाच्या अभ्यासाने घडले नाही. तर घरी दुकान होते. समोर दुकान व मागे घर असल्याने अगदी लहानपणापासून दुकानात बसावे लागायचे. ग्राहकांशी व्यवहार करतांना हिशोब करावा लागायचा. तोही बहुतेक वेळा तोंडी, कॅल्क्युलेटर वगैरे तर त्याकाळी पोहचलेलेच नव्हते. माझ्या वडीलांचा हिशोब तर अगदी तोंडपाठ असायचा. कितीही अंकी बेरजा ते अगदी झटक्यात व बिनचूक करायचेत. त्यांच्या प्रभावाने हिशोब जलदगतीने व न चुकता करायला शिकलो. आठवीत असतांना शाळेमध्ये संचयनी ही विद्यार्थ्यांची बचत बँक हि योजना नव्यानेच सुरू झाली होती, तिचा मॅनेजर म्हणून काम केले. या सर्वांचा फायदा गणित विषयाच्या अभ्यासासाठी सहजच झाला. म्हणूनच कदाचित गणित हा विषय माझा नेहमीसाठीच अतिशय आवडता राहिला. गणित विषयाच्या आवड व अभ्यासाने एकूणच माझ्यामध्ये असलेली हिशोबी वृत्ती विकसित झाली असावी व त्यामुळेच आयुष्यातील बर्‍याच गोष्टी काटेकोर व हिशोबाने करण्याची सवय लागली.
विज्ञान या विषयामध्ये १४७ मार्क घेवून बोर्डात ३ रा क्रमांक होता. त्याचेही कारण केवळ विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही; तर निरीक्षण व प्रयोग करून पाहण्याचा छंद. आठवीपासून माझ्या घरी माझी स्वत:ची भंगार सामानामधून उभारलेली छोटीशी प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत भौतिक, रसायन व जीवशास्त्राचे बहुतेक सर्व प्रयोग मी स्वत: केल्याचे आज ४० वर्षांनतरही मला स्पष्ट आठवते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास हा खेळाचा व आनंदाचा भाग झाला व त्याचे रुपांतर मार्कांमध्येही झाले. त्याशिवाय यातून वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, निरीक्षण व प्रयोगशीलता ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची मूलभूत साधने हाताळण्याचे कसब प्राप्त झाले; प्रत्यक्ष जीवनाच्याही प्रयोगशाळेत त्यामुळे नानाविध प्रयोग करता आलेत व जगणे सुध्दा आनंद व खेळ झाले. कोणत्याही प्रश्‍नाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करून उत्तरे शोधण्याची सवय लागली. समस्येला समस्या न मानता चॅलेंज म्हणून बघायला शिकलो. अशा आव्हानांना सामोरे जातांना स्वत:च्या क्षमतांचा शोध घेवून त्या विकसित करता आल्यात.
याच सवयी व वृत्ती पुढे १२ वी व मेडीकल कॉलेजमध्येही कायम राहिल्याने नेहमीच अभ्यास एन्जॉय करू शकलो. बहुतेक अभ्यासाची पुस्तके पण कथा-कादंबर्‍या वाचल्यासारखा आनंद देवून जायचीत. त्यामुळे अभ्यासाचे ओझे कधी वाटले नाही व फक्त परिक्षेमध्ये मार्क मिळविण्याच्या हेतूने पण कधी अभ्यास केला नाही.
आता कोणतीही परिक्षा द्यायची नसली तरी अभ्यासाची हीच सवय कायम आहे. आजही वर्षाला विविध विषयांचे, इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधील साधारणपणे ४०००० पेजेस वाचतो. त्यामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय जगाच्या बरोबर राहता येते. 
यावेळी एवढेच. याच प्रवासातील काही अनुभव पुढच्या वेळी …….
(१ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला काही तरी लिहायचे ठरवले होते. पण अजून सवय पक्की व्हायची आहे. आतापर्यंत तीन लेख लिहून झालेत. शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !, आपले वजन:आपल्या जीवनशैलीचे निदर्शक, व उपाशी न राहता वजन कमी करा, काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या  मागील ४० दिवसात जवळपास २७०० भेटी ब्लॉगला झाल्यात. आपण सर्वांचा जो उदंड प्रतिसाद मिळातोय, तो मला आळस झटकून लिहिणे सुरु ठेवायला भाग पाडत आहे.
आता मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव, काही लर्निन्ग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचे ठरवीत आहे. माझा शैक्षणिक प्रवास या आताच्या लेखात मला मिळालेल्या शैक्षणिक यशाकडे मागे वळून पाहताना काय वाटते ते लिहिले आहे. कदाचित यापैकी काही तुम्हाला पण उपयोगी पडू शकतील. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.)

6 replies on “माझा शैक्षणिक प्रवास”

खूप सुंदर आणि स्पष्ट लेख लिहिलात सर,
मला स्वतः कडे निक्षून पाहायला लावणारा लेख आहे, वाचन आणि लिखाण अगदी सुटून गेलय, मी ही आपल्याकडून प्रेरणा घेतोय. धन्यवाद सर!
असिफ

सर मी सध्या १ आय. टी. कंपनी चालवत आहे आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करायची इच्चा आहे. पण सुरवात कुठून आणि कशी करायची हेच कळत. सर मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी तुम्हाला भेटू शकतो काय ?

धन्यवाद
पियुष हलमारे
18pixeis .com

sir mala purnapane patle dhanyavad. Apan tarun manto ki system change karayachi .!
Pan kay garaj ahe shikshan kharach anubhavatun zale pahije pustakatun nave. Tumhi mazyasathi adarsh ahat

– pratap marode

Leave a Reply

Categories
Ageing Fittnesss Life Style Nutrition Positive Health Yoga

शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !

शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी ! 
डॉ. अविनाश सावजी 

माणसाला आपले आयुष्य कसे लांबविता येईल व तारुण्य दिर्घकाळपर्यंत कसे टिकविता येईल यासंदर्भात आज जगामध्ये भरपूर संशोधन सुरू आहे. माणसाची आर्युमर्यादा तर एकीकडे बरीच वाढलेली आहे. या वाढत्या आर्युमर्यादेसोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक यासारख्या आजारांचे प्रमाणसुध्दा वाढते आहे. त्यामुळे मिळालेले जास्तीचे आयुष्य निरामय कसे जगता येईल हा जगभरातील संशोधकांच्या संशोधनाचा महत्वाचा विषय बनलेला आहे. यासाठी काय करायला हवे याचे स्पष्ट दिशा दिग्दर्शन, आतापर्यंतच्या संशोधनाद्वारे करण्याच्या स्थितीमध्ये आता विज्ञान येवून पोहचलेले आहे.

या संदर्भामधील संशोधनातून असं लक्षात आलं की, जगामध्ये सगळ्यात जास्त शतकवीर, म्हणजे शंभरी पार केलेल्या व्यक्तींची संख्या, दक्षिण रशियामधील जॉर्जिया या प्रांतामधील अबखासीया या, कॉकेशस पर्वत रांगानी व्यापलेल्या पर्वतीय प्रदेशामध्ये राहणार्‍या जनजातीय लोकांमध्ये आहे. जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा या लोकांमध्ये शंभर वर्षापेक्षा जास्त जगणार्‍या व्यक्तींची संख्या काही पटीने अधिक आहे. त्यामुळे संशोधकांचं आणि डॉक्टरांचं लक्ष या विशिष्ट जमातीकडे वेधल्या गेलं. या लोकांच्या जीवनशैलीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ते दिर्घकाळपर्यंत आणि निरोगी जगतात, यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला गेला. या अभ्यासामधून या लोकांच्या दिर्घायू जगण्याचं आणि तारूण्य टिकविण्याचं रहस्य लक्षात आलं. त्यांच्या जगण्यामध्ये प्रामुख्याने चार तत्वं शास्त्रज्ञांना आढळली.

 ही चार तत्वे जगामध्ये इतरत्रही दिर्घकाळ जगणार्‍या व आपले तारुण्य टिकवून ठेवणार्‍या लोकांच्या जीवनशैलीच्या अभ्यासातून स्पष्ट झालेली आहेत. अगदी आपल्या गावातील ८०-९० वय गाठलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तरी, या तत्वांची पुष्टी आपल्याला स्वत:ला करुन घेणे पण सहज शक्य आहे. त्या तत्वांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंब ज्या प्रमाणात करता येईल, त्या प्रमाणात आपल्यालाही दिर्घकाळ पर्यंत निरामय जीवन जगता येईल व तारूण्यसुध्दा टिकविता येईल ही खात्री देता येवू शकते. ती तत्वे कोणती हे आपण समजून घेऊ या.

 १. शास्त्रज्ञांना हे आढळून आलं की येथील लोकांचा आहार हा ताजा व स्वच्छ आहे. (Clean & Fresh Diet) दिर्घायू बनण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी ताजा आणि स्वच्छ आहार हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. शेतामध्ये पिकलेला भाजीपाला वा फळे, कुठल्याही प्रकारे साठवणूक न करता वापरणे, म्हणजे ताजेपणा होय. याचा अर्थ निसर्गामध्ये खाण्याची वस्तू तयार होणे व आपल्या आहारामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होणे, यामधील कालावधी हा कमीत कमी असणे म्हणजे ताजेपणा. दिर्घकाळपर्यंत ताजेपणा टिकवून राहण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा, प्रिजर्वेटीव्हचा वा अन्य निरनिराळ्या पध्दतींचा वापर करणे, म्हणजे ताजेपणा नव्हे. आज बहुतेक सगळ्याच खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रियांचा अवलंब मुख्यत्वे वाहतुकीच्या सोयीसाठी आणि दिर्घकाळ पर्यत टिकवण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य तर कमी होतेच. शिवाय या सर्व रसायनांचे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. म्हणून अशा प्रक्रियायुक्त पदार्थाचा वापर कमीत कमी करायला हवा. अगदी फ्रिजमध्ये ताजे दिसत असणारे पदार्थ सुध्दा ताजे नव्हेत.

निसर्गामध्ये ज्या अवस्थेमध्ये खाद्यपदार्थ तयार होतात, तेथून प्रत्यक्ष मानवी वापराची सुरवात, यामधला कालावधी कमीत कमी असण्यासाठी गरजेचं असेल की, आपले खाद्य-पदार्थ हे आपल्या परिसरातच तयार झालेले असावेत. कुठेतरी दूरवर जगाच्या कोपर्‍यात पिकविले गेलेले फळ किवा अन्य खाद्यपदार्थ, शेकडो-हजारो किलोमीटर लांबवरच्या लोकांना वापरता यावे यासाठी कराव्या लागणार्‍या प्रक्रिया मानवी आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळे आपल्या परिसरात तयार होणारी, पिकविल्या जाणारी फळे व भाजीपाला, तसेच ज्या सिझनमध्ये ती तयार होतात त्याच काळात ती वापरणे म्हणजे ताजेपणा होय.

गांधीजीनी यासंदर्भात एक फार सोपे सूत्र सांगितले आहे. त्याहून सोपे आहार शास्त्र काही असू शकत नाही. गांधीजी असे म्हणतात की, ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होऊ शकतात त्या वस्तू आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू खूप दिवस न नासता, न खराब होता टिकून राहतात, बहुधा त्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. उदा. आज तयार केलेली पोळी, भाकरी, भात उद्या शिळा होतो व त्यावर लगेच बुरशी येते व ते खाण्यालायक उरत नाही. म्हणजेच पोळी, भाकरी, भात खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. या उलट कारखान्यात तयार झालेले बिस्कीट किंवा वेगवेगळ्या पॅकींगच्या वस्तु ज्या खूप दिवस पर्यंत चांगल्या राहतात, खराब होत नाही अशा गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. त्या ताज्या दिसत असल्या तरी त्यातील ताजेपणा संपलेला असतो.

आपल्या ताजेपणाच्या संकल्पना अर्धवट आहेत. बहुतेक घरांमध्ये अशी पध्दत दिसते की, नळ आलेत की, पिण्याचे पाणी भरताना कालचे भरलेले पाणी हे सांडून दिल्या जाते व ताजे पाणी भरल्या जाते. जर पाण्याच्या संदर्भामध्ये ताजेपणाची अशी संकल्पना आपण वापरतो तर ती आपल्याला आहाराच्या बाबत सुध्दा वापरायला पाहिजे. अशा पध्दतीचा ताजा आहार माणसाचे आयुष्य वाढविते व तारूण्य टिकवते.

 आहारा संदर्भात दुसरा मुद्दा म्हणजे स्वच्छ असणे. स्वच्छ याचा अर्थ केवळ दिसायला स्वच्छ असा नाही. तर ज्यामध्ये मूळ पदार्थाशिवाय इतर कुठल्याही गोष्टी नाहीत ते अन्न म्हणजे स्वच्छ होय. आज ज्या वस्तु स्वच्छ दिसतात त्या बहुदा स्वच्छ नसतात; (उदा. बहुतेक सर्व पॅकींगच्या वस्तू) कारण त्या स्वच्छ दिसण्यासाठी त्यांच्यावर खूप सार्‍या प्रक्रिया कराव्या लागतात वा त्यामध्ये वेगवेगळी रसायने वापरावी लागतात. असे अन्न म्हणजे अस्वच्छ अन्न. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेमध्ये कोणत्याही रसायनांशिवाय तयार होणारा भाजीपाला व फळे वापरणे मानवी आरोग्यासाठी चांगले आहे. वेगवेगळी रसायने वापरून पिकवल्या जाणार्‍या, शेतीमधील धान्य, डाळी, भाज्य-फळे हे स्वच्छ नाहीत. त्यामुळे रसायनमुक्त अन्न म्हणजे स्वच्छ अन्न हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा रसायनमुक्त व नैसर्गिक पध्दतीने तयार होणार्‍या खाद्य पदार्थाच्या सेवनाने माणसाचे आयुष्य वाढविता येते व तारूण्य टिकवता येते असं आज विज्ञान सांगते आहे.

 २. दिर्घायू होण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी दुसरे महत्वाचे तत्वजे शास्त्रज्ञांना आढळले ते म्हणजे, तेथील समाजातील लोक अखेरपर्यंत शरीरश्रम करतात. अगदी एकशे दोन वर्षाचा म्हातारा सुध्दा, तास-दोन तास शेतीमध्ये काम करतो. शंभर वर्षाची म्हातारी सुध्दा तास दोन तास घोड्यावरून रपेट मारून येते; घोड्यावर बसणे हा तेथील लोकांचा छंद आहे. याचाच अर्थ घाम गाळल्याशिवाय माणसाला आयुष्य वाढविता येत नाही वा तारूण्य टिकवता येत नाही. दुदैवाने आज आमचे सगळे प्रयत्न हे घाम कमीत कमी निघावा या दिशेने सुरू आहेत. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानवी शरीरश्रम दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. आजच्या जगाचे मुख्य आजार म्हणजे हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर वाढलेले असणे, डायबिटीस, वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे व लठ्ठपणा, हे सर्व शरीरश्रमाच्या अभावामुळे निर्माण होणारे आजार आहेत. शरीरश्रम केल्याशिवाय माणसाला दिर्घायू होता येत नाही व तारूण्य टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये शरीरश्रमाचे महत्व लक्षात घेऊन आपल्या दिनचर्येमध्ये ते नियमाने कसे करता येतील हे ज्याचे त्याने ठरवायला पाहिजे.

 आज शरीरश्रमापेक्षा बौध्दिक श्रमाला जास्त महत्व व किमत आलेली आहे. शरीरश्रमाला हलके मानले जाते. हा फरक कमी करणे एकूणच मानवी आरोग्यासाठी गरजेचे आहे. खासकरुन प्रत्येकाने जर उत्पादक श्रम आपल्या दिनचर्येचा भाग बनविला तर, आज समाजामध्ये दिसणारी वेगवेगळ्या प्रकारची विषमता सुध्दा कमी होईल. सर्वांचेच आरोग्य सुधारेल.

बैठी जीवनशैली असणार्‍यांसाठी शरीरश्रम हे अमृत व संजीवनी देणारे औषध आहे. त्यामुळे दिनचर्येमध्ये शरीरश्रम करत राहणे वा तशाप्रकारची जीवनशैली शक्य नसेल तर, जाणिवपूर्वक व्यायामासाठी वेळ राखून ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. असे केले तरच आपल्याला वाढत्या वयासोबत होणारे आजार टाळता येणे शक्य होईल.

 ३. तिसरा मुद्दा जो त्या समाजाच्या अभ्यासामधून लक्षात आला तो म्हणजे त्या समाजामध्ये पारस्पारिकता आहे. परस्परांमध्ये घट्ट संबंध व एक-दुसर्‍याच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्या जमातीच्या दिर्घायू जगण्याचे आणि तारूण्य टिकवण्यामागचे हे तिसरे रहस्य आहे. इंग्रजीमध्ये ज्याला ‘शेअरींग ऍन्ड केअरींग’ म्हणतात ते केल्याशिवाय माणसाला आपले आयुष्य वाढविता येत नाही वा तारूण्य टिकविता येत नाही असं आज आपल्याला विज्ञान सांगते. दुदैवाने आज आम्ही ना तर सुख वाटून घेत, ना तर दु:ख; प्रत्येकजन आपापल्या स्वार्थी आणि आत्मकेंद्रित वर्तुळात जगण्यामध्ये मशगुल झालेला आहे. अशाप्रकारच्या आत्मकेंद्रित जगण्याने आपले आयुष्य कमी होते व म्हातारपण लवकर येवू शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे; आणि मग आमची इच्छा असो वा नसो, आम्हाला जर मग लवकर मरायचं नाही आणि लवकर म्हातारं व्हायचं नाही, तर मग स्वत:ची व इतरांची सुख-दु:ख वाटून घ्यायला शिकावं लागेलं. हे केलं तरच आमचं आरोग्यसुध्दा टिकविता येऊ शकेल.

     आज वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरीकरण वाढत आहे. एकूणच जगणे सुपरफास्ट होत चाललेले आहे. जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेच्या रेट्यामुळे व वाढत्या चंगळवादापायी मानवी जीवनातील सहजता संपत चालली आहे. मानसिक तणाव वाढत चालला आहे. मानवी नात्याची वीण पार उसवून चुकली आहे. त्यामुळे आयुष्याची लांबी वाढूनही, वाढीव आयुष्यात सुख भोगणे माणसाच्या नशीबामध्ये दिसत नाही. या सगळ्यांचा विचार करता माणसाला आपल्या आयुष्याची लांबी वाढवितांना, आयुष्याची खोली कशी वाढविता र्यईल याचासुध्दा विचार करणे अगत्याचे झाले आहे.

४. चौथा मुद्दा जो लक्षात आला तो म्हणजे त्या लोकांच्या जगण्यामागे दिर्घकाळ आणि निरामय आयुष्य जगणे हा हेतू आहे. म्हणून ते लोक दिर्घायू होतात व तारूण्य टिकवितात. याचाच अर्थ माणसाला दिर्घायू होण्यासाठी आणि तारूण्य टिकविण्यासाठी जगण्याचा हेतू शोधायला हवा. ज्यांच्या जगण्यामागे काही हेतू आहे तेच लोक जास्त काळपर्यत जगू शकतात व म्हातारपण दूर ठेवू शकतात. मग माझ्या जगण्याचा हेतू काय आहे ? असा प्रश्‍न आमच्या पैकी किती लोकांना पडतो ? केवळ मरत नाही म्हणून जगतो आहे, अशाप्रकारचे जगणे आज आमच्या पैकी अनेकंाचे सुरू आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जगण्याचा हेतू शोधता येणं अत्यंत जरुरीचे बनले आहे. ते करता आले तरच आम्हाला आमचे आयुष्य वाढविता येईल व म्हातारपण दूर ठेवता येईल असं आज विज्ञान सांगते.

त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घेता यायला पाहिजे. एक म्हणजे जसे आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये राहणार्‍या सहाशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे सुध्दा सारखे नसतात. मग जर एवढ्या लोकांमध्ये दोन व्यक्तींचे अंगठ्याचे ठसे सुध्दा सारखे नाहीत, याचाच अर्थ माझ्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, जे जगामधील अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही. (देअर ईज समथींग स्पेशल इन माय सेल्फ) त्यामुळे माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे, काय स्पेशल आहे, याचा शोध घेणे हा माणसाचा जगण्याचा हेतू असू शकतो. एका बाजूने माझ्यामध्ये असे काय आहे की, जे जगामध्ये इतर कोणामध्येच नाही याचा शोध घेणे आणि दुसर्‍या बाजूने एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी समान आहे; (देअर ईज समथींग कॉमन अमँगस्ट अवरसेल्फ) मग हे कॉमन, हे समानत्व कोणते आहे याचा शोध घेणे. अशाप्रकारे एका बाजूने माझ्यामध्ये स्पेशल, माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे याचा शोध घेणे आणि दुसर्‍या बाजूने आपल्या सगळ्यांमध्ये काय समानत्व आहे याचा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ देतो. कदाचित हा माणसाच्या जगण्याचा हेतू असावा. असा शोध लागणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्‍चित घेऊ शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोली सुध्दा आपोआप वाढेल.

या सगळ्या तत्वांचे आपल्या जीवनशैलीमध्ये जागरुकतेने व डोळसपणे पालन करता आले तर, दिर्घायू बनने व तारूण्य टिकवून ठेवणे पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे असे आज विज्ञान आपल्याला सांगत आहे.

9 replies on “शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !”

डॉ. अविनाश, लेख छान आहे. माझ्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करत आहे.

'दीर्घायू' मधला 'दि' फक्त डोळ्यांना टोचतोय. जमल्यास दुरुस्ती व्हावी.

प्रज्ञा, निगडी

संग्रही ठेवण्यासारखा लेख आहे.
आणि हो पुणेकरांच्या "दि" कडे जरी दुर्लक्ष केले तरी काही हरकत नाही.
हा हा हा हा 🙂

नेहमीप्रमाणेच छान लेख.! मीपण सर्वांना शेयर करत आहे.. आणि अभ्यासाच्या टेबलसमोर एक कागद चिटकवत आहे..आचरणात आणण्यासाठी..तो असा (दीर्घ व गुणवत्तापूर्ण आयुष्यासाठी १) ताजे खा २)अंगमेहनत घे ३)मिळूनमिसळून रहा ४)निश्चित ध्येयाने वाटचाल कर)

Leave a Reply

Add address