Prayas Sevakur
Home > Spark

SPARK- 2017 :

 Life Changing Residential PD Camp for 5-12 th std. students. Pl.

तुमच्या मुलांनी जीवनात आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळविण्याची क्षमता व उर्जा त्यांच्यामध्ये आहे; पण ती बरीचशी अव्यक्त स्वरूपात (सुप्तावस्थेत) आहे व काही तर अज्ञातसुध्दा आहे. त्यांच्यामधील या प्रचंड प्रमाणात दडून असलेल्या व आतापर्यंत न वापरलेल्या अव्यक्त ऊर्जेचा उपयोग, त्यांचे स्वत:चे व समाजाचे जीवन समृद्ध करण्यासाठी होऊ शकतो. गरज आहे ती फक्त एखाद्या ठिणगीने हि ऊर्जा चेतविण्याची ! म्हणजेच एका स्पार्कची ! ही ठिणगी पडून या ऊर्जेने पेट घेतला की झाले ! जीवनाच्या गाडीने गती पकडलीच म्हणून समजा. अशी ठिणगी टाकून, उन्हाळी सुट्यांमध्ये तुमच्या मुलांमध्ये असलेली ही अव्यक्त ऊर्जा सृजनात्मक व सकारात्मक पद्धतीने चेतविण्यासाठी स्पार्क हे शिबिर !

जिंकण्यासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी आपल्या गुणांचा, शक्तिस्थानांचा व क्षमतांचा सतत शोध घ्यावा लागतो, त्यांना प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते; तर दोषांना ओळखून जाणीवपूर्वक दूर करावे लागते. स्पार्क 2017 शिबिरामध्ये सहभागी शिबिरार्थींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे, जिंकण्यासाठी स्वत:ला घडविण्याच्या मार्गावर अग्रेसर होता येईल.

शिबिरार्थींना विचार करायला प्रवृत्त करणारे, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारे, जाणिवा व संवेदनशीलता तीक्ष्ण करणारे हे कृतिपर संस्कारशील शिबिर आहे. आज सर्वत्र चालू असलेली मार्कांची स्पर्धा व शर्यतीला पूर्णपणे बाजूला सारून जिंकण्यासाठी स्वत:चा शोध घेण्याचा हा आनंददायी उपक्रम आहे. सर्वत्र होणार्‍या व्यक्तिमत्व विकास शिबिरांपेक्षा या शिबिराचे स्वरूप खूपच वेगळे असेल.

शिबिराचा उद्देश :

Prayas Sevakur